08/06/2025

करमाळा तालुक्यातील ग्रामपंचायतींचे सरपंचपद आरक्षण

0
IMG_20221129_130625.jpg

करमाळा, दि. 3 (करमाळा-LIVE)-
राज्य निवडणूक आयोगाने ऑक्टोबर 2022 ते डिसेंबर 2022 दरम्यान मुदत संपणाऱ्या महाराष्ट्रातील 7751 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये मुदत संपणाऱ्या 189 ग्रामपंचायतीची निवडणूक होत आहे तर करमाळा तालुक्यातील 30 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. त्यासाठी निवडणुकीसाठी 18 डिसेंबरला मतदान तर 20 डिसेंबर रोजी मतमोजणी होईल.

करमाळा तालुक्‍यातील सरपंच पद आरक्षण पुढीलप्रमाणे-
1) अनुसूचित जमाती स्त्री (ST Women)- वरकटणे
2) अनुसुचित जाती स्त्री (SC Women)- कुभारगावं- घरतवाडी, सातोली, खातगाव, तरटगाव, पांगरे
3) अनुसूचित जाती (SC)- सालसे, जातेगाव, बाळेवाडी, सांगवी, वीट, केत्तूर
4) नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री (OBC Women) खडकी, हिवरे, कोर्टी, पारेवाडी, केम, सरपडोह, अंजनडोह, टाकळी, जिंती, विहाळ, दिवेगव्हाण, वरकुटे, रोशेवाडी, कुंभेज
5) नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC)- पोंधवडी, वडगाव, लव्हे, हिसरे, कविटगाव, लिंबेवाडी, सोगाव, पोमलवाडी, फिसरे, सावडी, जेऊर, भोसे, कामुणे, कंदर
6) सर्वसाधारण स्त्री राखीव (OPEN Women)- वंजारवाडी, पुनवर केडगाव, मांगी, बोरगाव, दिलमेश्वर, घारगाव, पोटेगाव, हिवरवाडी, मीरगव्हाण, अर्जुननगर, गौंडरे, सौंदे, राजुरी, मांजरगाव, रिटेवाडी, कात्रज, कावळवाडी, देलवडी, कुगाव, बिटरगाव (वां), दहिगाव, आवाटी, मलवडी, गोयेगाव, चिखलठाण, भगतवाडी, शेलगाव (वा), रायगाव, भाळवणी, पांडे
7) सर्वसाधारण (OPEN)- आळसुंदे, आळजापूर, पाथर्डी, शेटफळ, गुळसडी, बिटरगाव (श्री), मोरवड, पोथरे, उम्रड, साडे, कोंढेज, वांगी, ढोकरी, कोळगाव, उंदरगाव, झरे, करंजे, पाडळी, वडशिवणे, शेलगावं (क), देवीचामाळ, निमगाव, घोटी, पिंपळवाडी, नेरले, वाशिंबे, पोफळज, निंभोरे, देवळाली, कोंढारचिंचोली

सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झालेले असून पुढीलप्रमाणे आरक्षण जाहीर झालेले आहे.

तहसीलदार यांनी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करण्याचा दिनांक -18 नोव्हेंबर 2022
नामनिर्देशन पत्र विक्री व स्वीकृतीचा दिनांक सोमवार 28 नोव्हेंबर 2022 ते शुक्रवार 2 डिसेंबर 2022
अर्ज छाननी करण्याचा दिनांक : सोमवार 5 डिसेंबर 2022
नामनिर्देशक पत्र मागे घेण्याचा अंतिम दिनांक : 7 डिसेंबर 2022 दुपारी 3 पर्यंत व त्याच दिवशी दुपारी 3 नंतर चिन्ह वाटप
आवश्यक असल्यास मतदान घेण्याचा दिनांक : 18 डिसेंबर 2022
मतमोजणी दिनांक : 20 डिसेंबर 2022

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page