‘स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी.! वांगी-3 येथे आईच्या पंचाहत्तरीच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन
शेटफळ, दि. 19 (करमाळा-LIVE)-
आईने केलेल्या कष्टाची जाणीव ठेवून करमाळा तालुक्यातील वांगी-3 येथे आईच्या पंचाहत्तरीच्या निमित्ताने मुलांनी केली पाद्यपुजा, ग्रंथतुला व अन्नदान व धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
वांगी-3 येथील विकास वाघमोडे यांच्या मातोश्री पमाबाई वाघमोडे यांनी हालाखीची परिस्थिती असताना संघर्षमय जीवनातून आपल्या मुलांना वाढवले व उत्तम संस्कार दिले याची जाणीव ठेवून पंचाहत्तरी निमीत्त मोठ्या उत्साहात हरिपाठ, ग्रंथतुला, पाद्यपूजा व ऐंद्रीशांती अशा धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यानंतर अक्रूर महाराज गेवराई यांचे किर्तन कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी मृदंगाचार्य आसाराम साबळे, दादासाहेब डोंबाळे, अदित्य पोळ गायानाचार्य इंडियन आयडॉल फेम अविनाश जाधव, दत्ता चव्हाण, योगीता डोंबाळे यांनी साथ दिली.
सुरवातीला विकास वाघमोडे, अशोक वाघमोडे, दिपक वाघमोडे, सिंधू खंडागळे यांनी पाद्यपूजा केली नंतर मातोश्रींची ग्रंथतुला करून ग्रंथतुला केलेले ग्रंथ हसन महाराज अत्तार यांच्या रामकृष्ण हरी वारकरी संस्था (कुर्डू) या संस्थेला दान करण्यात आले. यावेळी बालाजी बोराडे, विनोद रोकडे, माऊली नंदनकर, हनुमंत कोरे, दत्ता डुके, मारूती निंबाळकर, उद्धव भोसले, कल्याण चुंब, माजी आमदार नारायण पाटील, प्रा. गणेश करे-पाटील, हरिदास डांगे, जयप्रकाश बिले, महेंद्र पाटील यांच्यासह परिसरातील लोक बहुसंख्येने उपस्थित होते.