17/12/2024

मिरजगावं येथील सद्गुरू कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची वांगी-3 येथे भेट ; शेतकऱ्यांना केले मार्गदर्शन

0
IMG-20240120-WA0031.jpg

वांगी, दि. 20 (करमाळा-LIVE)-
मिरजगाव येथील सद्गुरु कृषी महाविद्यालय येथील कृषीदुतांकडून वांगी-3 येथील शेतकऱ्यांना‌ विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.

करमाळा तालुक्याील वांगी-3 येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न व श्री संत गजानन महाराज ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित सद्गुरु कृषी महाविद्यालय मिरजगाव येथील कृषी दुताचे आगमन झाले गावातील ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. महाविद्यालयाच्या ग्रामीण कृषी जागरूकता व कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कृषीदुत ओंकार लबडे, युवराज शिंदे, स्वप्नील साळुंके, सौरभ सुद्रिक, खुदाबक्ष जमादार, प्रथमेश दहा आठवडे वांगी-3 गावामध्ये राहून विविध शेती विषयक प्रात्यक्षिके व उपक्रम राबवण्यास सुरुवात केली प्रत्यक्ष प्लॉटवर जाऊन शेतकऱ्यांमध्ये रासायनिक खताच्या वापरासासंबधी शास्त्रीय माहिती देऊन शेतकऱ्यांचे प्रबोधन करून त्यांच्यामध्ये जागरूकता निर्माण केली.

ग्रामस्थांना व शेतकऱ्यांना उपक्रमाचा उद्देश व रूपरेषा समजावून सांगितली. यावेळी वांगी-3 गावच्या सरपंचांनी गावची थोडक्यात माहिती दिऊन विद्यार्थ्याना सहकार्य करण्याचे आवाहन ग्रामस्थांना केले. तसेच ग्रामसेवकांनी ग्रामस्थांना विद्यार्थ्याच्या उपक्रमाला आवश्यक ते सहकार्य प्रशासनाकडून केले जाईल असे सांगितले यावेळी सरपंच मयुर महादेव रोकडे, ग्रामसेवक तानाजी पाटील, भाऊसाहेब गोडसे तसेच गावातील ग्रामस्थ व प्रगतशील शेतकरी उपस्थित होते. या उपक्रमासाठी कृषी दुतांचे संस्थेच्या अध्यक्षा सौ. कल्याणी ताई नेवसे, संस्थापक शंकर शेठ नेवसे, सचिव राजेंद्रजी गोरे, प्रशासकीय अधिकारी सखाराम राजळे सर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.के बिटे, कार्यक्रम अधिकारी प्रा.यादव एस.व्ही, प्रा. पवार ए.व्ही. आणि महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हेही वाचा….

You cannot copy content of this page