इंग्लिश टीचर्स असोशिएशनच्या प्रमुख सल्लागार पदी प्रा.करे-पाटील यांची निवड
करमाळा, दि. 31 (करमाळा-LIVE)-
गुणात्मक वाढीबरोबरच विद्यार्थ्यांचे इंग्रजी भाषेवर प्रभुत्व निर्माण व्हायला हवे तरच त्याच्यात आत्मविश्वास वाढेल व पुढील शैक्षणिक वाटचालीत व्यक्तिमत्व विकास साधता येईल असे मत प्रा. गणेश करे पाटील यांनी मांडले. करमाळा तालुका इंग्लिश टीचर्स असोसिएशन च्या वतीने आयोजित कृतज्ञता सन्मान समारंभात अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते.
नुकताच अक्कलकोट स्वामी समर्थ देवस्थान ट्रस्टचा समाजरत्न हा पुरस्कार प्रदान करण्यात आल्याबद्दल तसेच यशकल्याणी सेवाभावी संस्थेच्या सहकार्याने व पंचायत समिती शिक्षण विभाग यांचे संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय इंग्रजी कार्यशाळेचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल प्रा.गणेश करे-पाटील यांचा अभिनंदन व कृतज्ञता सन्मान समारंभ नुकताच यश कल्याणी सेवाभवन येथे आयोजित करण्यात आल्याचे प्रसिद्धी प्रमुख सुखदेव गिलबीलेव सचिव गोपाळ तकीक-पाटील यांनी सांगितले.
प्रा.करे-पाटील पुढे म्हणाले की, स्पर्धेच्या युगात आपले विद्यार्थी तयारी निशी पुढे यावेत, यशस्वी व्हावेत यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या करमाळा तालुक्यातील इंग्लीश लैंग्वेज टीचर्स असोसिएशनच्या पाठीशी यशकल्याणी संस्था भक्कमपणे उभी असेल. यासाठी कालबद्ध व अभ्यासपूर्ण उपक्रमांवर भर देण्यात यावा अशी अपेक्षा प्रा.करे पाटील यांनी व्यक्त केली. प्रास्ताविक प्रा. बाळकृष्ण लावंड यांनी केले. प्रा. भिष्माचार्य चांदणे, प्रा.मारूती किरवे, प्रा. कांबळे मॅडम, प्रा. विजयकुमार वनवे, प्रा. कल्याणराव साळुंके, प्रा.मारूती जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
दरम्यान प्रा.मारूती जाधव यांनी आपल्या मनोगतामधून प्रा.गणेश करे- पाटील यांची असोसिएशनच्या सल्लागारपदी निवडीची सूचना मांडली त्यास उपस्थित सर्वानुमते आदरपूर्वक मान्यता देण्यात आली. त्यानंतर प्रा.करे पाटील यांचा उपस्थित शिक्षकांचे वतीने भव्य सत्कार करण्यात आला. असोसिएशनचे सल्लागार पद स्वीकारल्या बद्दल तालुका अध्यक्ष कल्याणराव साळुंके यांनी प्रा.करे-पाटील यांचे अभिनंदन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सुखदेव गिलबिले यांनी केले तर उपस्थितांचे आभार कवी प्रा.नवनाथ खरात यांनी मानले. यावेळी, प्रा. भिष्माचार्य चांदणे, प्रा.मारूती किरवे, प्रा.बाळकृष्ण लावंड, प्रा.कल्याणराव साळुंके, प्रा.गोपाळ तकीक पाटील, प्रा.मारुती जाधव, प्रा. रोडगे, प्रा. निवृत्ती बांडे, शशिकांत गोमे, प्रा.पुरुषोत्तम माने, प्रा. गणेश गायकवाड, प्रा. तनपुरे, छायाचित्रकार भिवा वाघमोडे तसेच अन्य शिक्षक बांधव उपस्थित होते.