करमाळा : यशकल्याणी सेवाभवन संस्थेत येत्या गुरूवारी जिल्हास्तरीय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन- प्रा. गणेश करे-पाटील यांची माहिती

करमाळा, दि. ५ (करमाळा-LIVE)-
करमाळ्यातील यशकल्याणी सेवाभवन संस्थेत येत्या गुरूवारी ८ आॕगस्टला जिल्हास्तरीय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती प्रा. गणेश करे-पाटील यांनी दिली आहे.
यावेळी इंग्रजी अभ्यास मंडळातील तज्ञ प्रा. चांदशेख, प्रा. काझी, प्रा.दुधनकर यांचे होणार मार्गदर्शन मिळणार असून मानचिन्ह, प्रमाणपत्रासह यशकल्याणी तर्फे हजारो रुपयांच्या बक्षिसांसह विजेत्यांचा सन्मान होणार आहे.
लोकशिक्षिका स्व.लिलाताई दिवेकर स्मृती दिनानिमित्त यशकल्याणी सेवाभावी संस्था, पंचायत समिती शिक्षण विभाग व जिल्हा इंग्लिश टीचर्स असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय स्पर्धा नुकत्याच संपन्न झाल्या.
पाचवी ते दहावी च्या विद्यार्थ्यांसाठी सर्व तालुक्यांमध्ये इंग्रजी वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. प्रत्येक तालुक्यातून तीन गटांतील प्रत्येकी प्रथम कमांकाच्या विजेत्याची जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेसाठी निवड करण्यात आलेली आहे.
या स्पर्धा गुरुवार दि. ८ ऑगस्टला सकाळी १० वाजता करमाळा येथील यशकल्याणी सेवाभवन येथे सुरु होतील. या समारंभात टिचर एज्युकेटर, बोर्ड स्टडी ग्रुप मेंबर सुलतानचांद शेख, तसेच महाराष्ट्र शासनाच्या अभ्यास मंडळात कार्यरत असणारे ब्रिटीश कौंसिलचे टिचर मेंटॉर प्रा.अशपाक काझी व प्रा.डॉ. महेश दूधनकर यांचे मार्गदर्शन होणार असल्याची माहिती यशकल्याणीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. गणेश करे- पाटील यांनी दिली आहे.