लोकशिक्षिका स्व. लीलाताई दिवेकर बालगौरव पुरस्काराने सृष्टी आदलिंग सन्मानीत



गगनाला पंख नवे….!
गुरूर तेरी ऊंचाइयों का
आसमान मैं तोड़ दूंगा,
एक दिन इतना ऊपर उडूंगा,
की तुझे नीचे छोड़ दूंगा।
करमाळा, दि. 30 (करमाळा-LIVE)-
कु.सृष्टी आदलिंग या शालेय मुलीने आपल्या अपंगत्वावर मात करत इ.१०वी मधे इंग्लिश विषयात करमाळा तालुक्यात प्रथम क्रमांक संपादित करत इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा दिली आहे.
आपल्या समाजात वावरत असताना आजूबाजूला आपण अनेक व्यक्ती पाहतो, ज्यांनी त्यांच्या अडचणीवर मात करत आपलं आयुष्य अतिशय सकारात्मक बनवलंय. या वर्गात दिव्यांग व्यक्तींचा उल्लेख आवर्जून करावासा वाटतो. जन्मत:च किंवा काही अपघाताने जेव्हा त्यांच्या वाट्याला अपंगत्व येतं तेव्हा त्यावर मात करणं ही सोपी गोष्ट नसते. परंतू जे आपल्याकडे नाही त्याचा विचार न करता जे आहे त्याचा वापर आपल्याला प्रभावीपणे कसा करता येईल, याचा विचार जेव्हा या दिव्यांग व्यक्ती करतात तेव्हा त्यांच्या आयुष्यातल्या यशाचा आलेख हा नेहमीच चढता असतो. म्हणूनच समाजातल्या या घटकाचा विचार आपण जाणीवपूर्वक करायला हवा.या कार्यक्रमाच्या निमित्ताने सृष्टीच्या यशाची दखल सर्वांनीच नक्कीच घ्यायला हवी.

कु.सृष्टीने मिळवलेल्या या दैदिप्यमान यशाबद्दल तिला यशकल्याणी सेवाभावी संस्था करमाळा, शिक्षण विभाग पंचायत समिती करमाळा व इंग्लिश लँग्वेज टीचर्स असोसिएशन, करमाळा यांच्या संयुक्त विद्यमाने लोकशिक्षिका लीलाताई दिवेकर बालगौरव पुरस्कार स्मृतिचिन्ह रोख रू ३०००/ – सुवर्णपदक व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
या पुरस्काराबद्दल सृष्टीच्या पालकांनी यशकल्याणी संस्थेचे अध्यक्ष प्रा.करे- पाटील सरांचे आभार व्यक्त केले.


