प्र.तहसीलदार विजयकुमार जाधव यांच्या आश्वासनानंतर युवासेनेचे उपोषण मागे ; शब्द न पाळल्यास आत्मदहन करणार- युवासेनेचे शंभूराजे फरतडे यांचा इशारा
करमाळा, दि. 16 (करमाळा-LIVE)- प्र.तहसीलदार विजयकुमार जाधव यांच्या आश्वासनानंतर युवासेनेचे उपोषण मागे घेण्यात आले असुन शब्द न पाळल्यास आत्मदहन करणार असल्याचा इशारा युवासेनेचे शंभूराजे फरतडे यांनी दिला आहे.
ऊसबील अतिवृष्टी अनुदान, करमाळा, कोर्टी, केत्तूर मंडलातील शेतकऱ्यांचा सततच्या पावसात समावेश करून नुकसान भरपाई द्यावी, पि एम किसान सन्मान योजनेतील लाभार्थ्यांची हेळसांड थांबवा इत्यादी मागण्यासाठी युवासेना विस्तारक उत्तम आयवळे, शिवसेना माजी तालुकाप्रमुख शाहुराव फरतडे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना तालुकाप्रमुख शंभूराजे फरतडे यांनी १४ ऑगस्ट रोजी तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरु केले होते.
यावेळी श्री फरतडे यांनी अक्रमक पवित्रा घेऊन विद्यमान लोकप्रतिनिधी तसेच प्रमुख विरोधी नेते व कारखानदारांकडून शेतकऱ्यांची चेष्ठा सुरु असून प्रशासक सत्ताधाऱ्यांच्या दबावत असल्याचा आरोप केला होता तसेच साखर आयुक्तचा नियम मोडून पंधरा दिवसांत पहिला हप्ता न देणाऱ्या कारखान्यावर गुन्हा दाखल करून जप्ती करण्याची मागणी लावून धरली होती. सरकार गतिमान असल्याचा आव आणत आहे मात्र एक वर्षापासून शेतकरी ऊसबील व अतिवृष्टी अनुदानाची वाट पाहत असल्याने हे फक्त नावालाच गतीमान सरकार असल्याची टिका देखील श्री फरतडे यांनी केली.
पत्रकार बांधवानी व विविध संघटनांनी आंदोलनास पाठिंबा देऊन प्रसिद्धी दिल्यानंतर तहसीलदार विजयकुमार जाधव यांनी समक्ष येवून मध्यस्थी करुन लेखी आश्वासन दिले.
तहसीलदार विजयकुमार जाधव यांनी आंदोलनकर्त्यांना आश्वस्त करताना सांगीतले की कमलाई शुगर ची साखर जप्त करून विक्री सुरु असून आजपासूनच पंधराशे रुपयांप्रमाणे पेमेंट सुटणार आहे. मकाई साखर कारखान्यावर जप्ती किंवा बोजा चढवण्याबाबत प्रकिया सुरु असून दोन दिवसात मकाई वर कायदेशीर कारवाई करू तसेच करमाळा कोर्टी, केत्तूर मंडलातील शेतकऱ्यांना सतत च्या पावसात समावेश करण्यासाठी योग्य तो प्रस्ताव पाठवला असून १६ कोटी रूपये नुकसानभरपाई मागितली आहे. नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना मदत मिळाली आहे काही शेतकऱ्यांचे बॅंक तपशील आधार चुकीचे असल्याने दुरुस्त करून पाठवले आहे. ज्यांचे सर्व तपशील बरोबर आहे अशांना टप्यात टप्यात शासनाकडून पैसे थेट खात्यावर जमा होत आहेत , पि एम किसान सन्मान योजनेतील लाभार्थ्यांकडून कृषी, तलाटी व ग्रामसेवक यांच्या मार्फत केवायसी करून घेत आहोत मात्र लॅण्ड सिडींग नो.(भुमीअभिलेख अद्ययावत नसणे) या त्रुटी साठी २२ ऑगस्ट पासुन विशेष कॅम्प आयोजित केला जाईल.
तहसीलदार विजयकुमार जाधव यांनी आश्वासन दिल्यानंतर आम्ही आंदोलन स्थगित करत आहेत मात्र दिलेली आश्वासने पाळली नाहीत तर अत्मदहन आंदोलन करू असा इशारा युवासेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख शंभूराजे फरतडे यांनी दिला.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख शाहुराव फरतडे, माजी उपसरपंच शिवसेना शाखा प्रमुख उत्तम हनपुडे, माजी उपसरपंच जोतीराम घाडगे, तालुका सरचिटणीस उपसरपंच पांडुरंग ढाणे, युवासेना उपप्रमुख अभिषेक मोरे, शाखा प्रमुख ओंकार कोठारे, शाखा उपप्रमुख मयुर तावरे, पप्पू निकाम , सुरज पुजारी आदी उपस्थित होते. ग्रामसुधार समीतीचे अध्यक्ष डाॅ बाबूराव हिरडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अमोल घुमरे दिपक शिंदे, आरपीयचे अर्जूनराव गाडे, यशपाल कांबळे, माजी नगरसेवक फारूक जमादार, भिमदलचे सुनिल भोसले, शहाजी धेंडे, आदींनी आंदोलनास पाठींबा दिला.