झरे येथील जयप्रकाश बिले स्कूलमध्ये क्रीडा सप्ताह संपन्न

करमाळा, दि. 20 (करमाळा-LIVE)-
खेळाडूंच्या पाठीशी बिले परिवार सदैव उभा राहणार असल्याचे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे माजी प्राचार्य जयप्रकाश बिले यांनी केले.
यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र राज्य मल्लखांब असोसिएशन सहसचिव व आंतराष्ट्रीय पंच पांडुरंग वाघमारे सर, योद्धा करिअर एक्याडमी चे संचालक गिते सर संस्था संचालिका डॉ स्वाती बिले आदी उपस्थित होते.
झरे येथे जयप्रकाश बिले पब्लिक स्कूल येथे क्रीडा सप्ताहचे निमित विविध प्रकारच्या क्रीडा स्पर्धा चे आयोजन करण्यात आले होते स्पर्धेचे उद्घाटन श्री पांडुरंग वाघमारे सर यांचे हस्ते श्रीफळ फोडून करण्यात आले. या वेळी वाघमारे सर यांनीही खेळाडूंना शुभेच्छा दिल्या खेळाडूंनी स्पर्धेत जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा कारण खेळणे हा मुलांचा नैसर्गिक अधिकार असून खेळाने शरीराचा व मनाचा विकास होतो. तसेच शरीराचे स्वास्थ ठिकून राहाते असे शेवटी वाघमारे सर यांनी सांगितले.
उपस्थित मान्यवरांचे स्वागत डॉ स्वाती बिले यांनी केले तर आभार प्राचार्य खराडे सर यांनी केले.



- वैष्णवी, सुचिता अन् रोहित यांची पोलिस दलात निवड ; तिघांचा कुंभेज येथे सन्मान
- श्री.वटवृक्ष मंदिरात स्वामी समर्थांच्या पुण्यतिथी महोत्सवाच्या धर्मसंकीर्तन व्यासपीठाचे पूजन
- जेऊर येथे महिला दिन उत्साहात साजरा ; ‘हिरकणी’ स्पर्धेत अपेक्षा अवसरे यांचा प्रथम क्रमांक
- अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ रुग्णालयात होमिओपॅथिक शिबीर संपन्न
- आवाटी येथे सोमवारी हजरत बु ‘अलीशाह कलंदर रह पानीपत’ यांच्या स्मरणार्थ ‘उर्स कलंदर’ कार्यक्रमाचे आयोजन
