जेऊर येथील सौ. किरण वळेकर यांना विमा क्षेत्रातील सर्वोच्च असा MDRT पुरस्कार जाहीर – सलग पाचव्यांदा होणार सन्मान

जेऊर, दि. ३ (करमाळा-LIVE)-
करमाळा तालुक्यातील जेऊर येथील एलआयसी (LIC) चे मुख्य आयुर्विमा सल्लागार धनंजय वळेकर यांच्या पत्नी सौ किरण धनंजय वळेकर यांना एलआयसी (LIC) चा MDRT 2025 (मिलियन डाॅलर राऊंड टेबल) हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.
एलआयसी (LIC) चा MDRT 2025 (मिलियन डाॅलर राऊंड टेबल) हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार सौ वळेकर यांना सलग पाचव्यांदा मिळालेला आहे.
यावेळी बार्शी शाखेचे शाखाधिकारी किशोर वानखेडे यांनी सौ वळेकर यांचा सन्मान करून अभिनंदन केले आहे.
जास्तीत जास्त कुटुंबांपर्यंत पोहचून एलआयसी (LIC) च्या योजनेचा लाभ कसा घेता येईल यावर आमचा सतत भर असतो, एलआयसीच्या माध्यमातून ग्राहकांना फायदा होईल याची आम्ही काळजी घेतो, पुढील काळातही जास्तीतजास्त कुटुंबीयांपर्यंत पोहचून एलआयसीचा लाभ मिळवून देणार आहे.
सौ किरण धनंजय वळेकर, विमा सल्लागार, जेऊर



- वैष्णवी, सुचिता अन् रोहित यांची पोलिस दलात निवड ; तिघांचा कुंभेज येथे सन्मान
- श्री.वटवृक्ष मंदिरात स्वामी समर्थांच्या पुण्यतिथी महोत्सवाच्या धर्मसंकीर्तन व्यासपीठाचे पूजन
- जेऊर येथे महिला दिन उत्साहात साजरा ; ‘हिरकणी’ स्पर्धेत अपेक्षा अवसरे यांचा प्रथम क्रमांक
- अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ रुग्णालयात होमिओपॅथिक शिबीर संपन्न
- आवाटी येथे सोमवारी हजरत बु ‘अलीशाह कलंदर रह पानीपत’ यांच्या स्मरणार्थ ‘उर्स कलंदर’ कार्यक्रमाचे आयोजन

