Jeur: बारावी पास गुणवंत विद्यार्थ्यांचा श्री कॉम्प्युटर्सच्या वतीने सन्मान
जेऊर, दि. २५ (करमाळा-LIVE)-
बारावी परीक्षेत पास झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा जेऊर येथील श्री कॉम्प्युटर्सच्या वतीने सन्मान करण्यात आला.
श्री कॉम्प्युटर हे जेऊर मध्ये गेल्या २१ वर्षांपासून शासनमान्य एमकेसीएल मान्यता प्राप्त सेंटर असून दरवर्षी विद्यार्थ्यांसाठी व सामाजिक कार्यासाठी अग्रेसर असते.
गाव स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, प्रवासी संघटना, होतकरू व गरीब विद्यार्थ्यांना सहकार्य अशा अनेक कामांमध्ये श्री कॉम्प्युटर्सचे संचालक प्रदीप पवार अग्रेसर असतात.
बारावी पास झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा फॉरेन्सिक लॅब (सीआयडी) पुणे येथे काम करणाऱ्या
शशिकांत वाघमारे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन करण्यात आला.
यावेळी शशिकांत वाघमारे यांनी कॉम्प्युटर क्लास, एमएससीआयटी (MSCIT) याचे कोर्सचे किती महत्त्व आहे याविषयी माहिती सांगितली.
श्री वाघमारे यांनी हा कोर्स ज्यावेळेस त्यांनी केलेला नव्हता त्यावेळेस त्यांना आलेल्या अडचणी व्यक्त केल्या.
यावेळी श्री कॉम्प्युटर चे संचालक प्रदीप पवार, नीलम पवार, हर्षद शेख उपस्थित होते.