करमाळ्यात नंदन प्रतिष्ठानच्या वतीने भव्य योग शिबिराचे आयोजन
करमाळा, दि. १८ (करमाळा-LIVE)-
जागतिक योग दिन चे औचित्य साधून करमाळा शहरात नंदन प्रतिष्ठान आणि पतंजली योग समिती करमाळा यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेचे अध्यक्ष तथा भाजपा चे सरचिटणीस जितेश कटारिया यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरामध्ये योग शिक्षक बाळासाहेब नरारे सर आणि त्यांचे सहकारी योग प्राणायाम करून आपले जीवन व आरोग्य निरोगी व सुदृढ राहण्यासाठी मार्गदर्शन करणार आहेत. या शिबिरामध्ये महिलांची बसण्याची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.
हे शिबीर 21 जून 2024 रोजी , सकाळी 6.45 ते 8 वाजेपर्यंत, श्री संत संताजी नगर, जुना बायपास, दुधे CT स्कॅन येथे होणार आहे. तरी या शिबिराचा करमाळा शहरातील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन नंदन प्रतिष्ठान च्या वतीने अक्षय परदेशी यांनी केले आहे.