कावळवाडीचे ग्रामसेवक सव्वा वर्षांपासून गायब ; येत्या २६ जानेवारीला ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकणार- संतप्त ग्रामस्थांचा इशारा

करमाळा, दि. २५ (करमाळा-LIVE)-
करमाळा तालुक्यातील कावळवाडीचे ग्रामसेवक सध्या गायब असून गेल्या सव्वा वर्षांपासून ते गावात फिरकले नाहीत गावातील नागरिकांचे अनेक कामे यामुळे खोळंबली असून या निषेधार्त येत्या २६ जानेवारीला ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकणार असल्याचे संतप्त ग्रामस्थांनी इशारा दिला आहे.
याबाबत माहिती अशी की, कावळवाडी ग्रामपंचायतला डी.वाय शिंदे हे ग्रामसेवक कार्यरत आहेत. गेल्या सव्वा वर्षांपासून ते गावात आलेले नाही परिणामी गावातील नागरिक अनेक योजना आणि कामांमुळे वंचित राहिलेले आहेत.
गावातील एकही सामाजिक काम व समाज उपयोगी कामे असा एकही ठराव पंचायत समिती कडे दिलेला नाही. गेल्या कित्येक दिवसांपासून सदरील ग्रामसेवक गैरहजर राहत असून मोबाईल वर संपर्क साधला असता फोन बंद ठेवत आहेत.
सदरील ग्रामसेवक यांची लेखी तक्रार करूनही अधिकारी त्यांना पाठीशी घालत आहेत. त्यामुळे गावातील जनता आता संतप्त झालेली असून येत्या २६ जानेवारीला ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकणार आहेत तसेच सदरील ग्रामसेवकाची बदली करून नवीन ग्रामसेवकाची नेमणूक करावी अशी मागणी निवेदनात केलेली आहे.