भारतीय जनता पार्टीने संधी दिल्यास करमाळा नगरपालिका निवडणूक लढविणार- रितेश कटारिया
करमाळा, दि. ८ (करमाळा-LIVE)-
भारतीय जनता पार्टीने संधी दिल्यास करमाळा नगरपालिका निवडणूक लढविणार असल्याचे मत सामाजिक कार्यकर्ते आणि व्यापारी रितेश कटारिया यांनी व्यक्त केले आहे.
करमाळा नगरपालिकेची निवडणूक लागलेली असून येत्या सोमवार पासून उमेदवारी अर्ज दाखल सुरू होणार आहे. भाजप ने उमेदवारी दिल्यास आपण नगरपालिकेची निवडणूक प्रभाग क्र-६ मधून लढविणार असल्याचे मत श्री कटारिया यांनी व्यक्त केलेले आहे. नगरपालिकेची निवडणूक यावेळी तिरंगी होण्याची शक्यता आहे.






