जेऊर येथे कर्मयोगी गोविंदबापू पाटील यांच्या जयंती निमित्त आयोजित हँडबॉल स्पर्धा संपन्न ; सांगलीचा संघ विजयी



जेऊर, दि. 27 (करमाळा-LIVE)-
कर्मयोगी गोविंदबापू पाटील यांच्या 93 व्या जयंतीनिमित्त 43 वी 19 वर्ष मुले महाराष्ट्र राज्य हँडबॉल अजिंक्यपद स्पर्धा जेऊर येथे पार पडली.
या स्पर्धेचे उद्घाटन भाजप नेते धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी आमदार नारायण आबा पाटील, डबल उपमहाराष्ट्र केसरी अतुल पाटील, माजी जि.प सदस्य सौ सविताराजे भोसले, धुळाभाऊ कोकरे, सरपंच पृथ्वीराज पाटील, महाराष्ट्र हँडबॉल असोसिएशनचे सचिव राजाराम राऊत, सहसचिव रुपेश मोरे, डॉ आनंद चव्हाण, प्रा अर्जुनराव सरक, सुनील तळेकर तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नूतन हँडबॉल असोसिएशनचे सचिव विनोद गरड यांनी केले.
या स्पर्धा तीन दिवस चालल्या यास्पर्धेमध्ये महाराष्ट्रातून 25 संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेमध्ये सांगलीचा विजयी झाला असून जळगावचा उपविजयी तर पुण्याचा तिसऱ्या आला आहे.
नूतन हँडबॉल असोसिएशनचे अध्यक्ष संतोष नुस्ते, सचिव विनोद गरड, नौशाद जहागीरदार, दत्तात्रय वाघमोडे, यशवंत कुदळे, रेहान तांबोळी, रोहन मुटेकर, सागर जाधव, निलेश सातव, अकिब पठाण, वैभव वाघमोडे, सनी ताटे आदींनी परिश्रम घेतले.
- भारत प्रायमरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी बनविले आकाश कंदील व भेटकार्ड
- सोलापूर सामाजिक वनीकरण विभागाकडुन आयोजित स्पर्धेत जेऊरच्या भारत हायस्कूलची आरूषी बादल प्रथम तर शिवानी कुंभार तृतीय
- स्वतःचा कारखाना विकणाऱ्या माजी आमदार शिंदे आणि त्यांच्या गटाने आदिनाथची काळजी करू नये- पाटील गट
- जेऊर येथील ओंकार पोळ याचे प्रथम पुण्यस्मरण ; केम व शेटफळ येथे विद्यार्थ्यांना भोजन व शालेय साहित्यांचे वाटप
- कोर्टीच्या सरपंच भाग्यश्री नाळे-मेहेर यांना ग्रामररत्न सरपंच पुरस्कार जाहीर

