स्वातंत्र्य दिनानिमित्त केडगावं येथे रक्तदान शिबीराचे आयोजन
जेऊर, दि. 15 (करमाळा-LIVE)-
करमाळा तालुक्यातील केडगांव येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त शिवगर्जना युवा प्रतिष्ठाणच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या रक्तदान शिबिरात तरुण पिढी आणि नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला आहे. रक्तदान हेच श्रेष्ठ दान मानले जाते. जगभरातील सर्व गरजू तसेच शरीरात रक्ताची कमतरता असलेल्या व्यक्तींना रक्त प्राप्त व्हावे यासाठी शिवगर्जना प्रतिष्ठान सातत्याने प्रत्येक वेळी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते.
यावेळी केडगावं चे सरपंच तसेच सदस्य आणि टीव्ही 9 मराठीचे करमाळा तालुक्याचे रिपोर्टर सोनेश्वर पाटील उपस्थित होते. मोठ्या प्रमाणात तरुणांकडून रक्तदान करण्यात येत आहे.