केडगावं शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी रविराज शिंदे तर उपाध्यक्षपदी वैष्णवी शिंदे यांची निवड


केडगावं, दि. 7 (करमाळा-LIVE)-
केडगावं येथील जिल्हा परिषद शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी रविराज माणिक शिंदे यांची तर उपाध्यक्षपदी वैष्णवी परमेश्वर शिंदे यांची निवड करण्यात आली.
केडगावं येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे शाळा व्यवस्थापन समितीचे पुनर्गठन करण्यात आले. त्याला सर्व पालकांनी संमती दर्शविली.
सदर पालक सभेत शाळेचे मुख्याध्यापक विठ्ठल मोरे यांनी शासकीय परिपत्रकाप्रमाणे सदर समितीचे शासकीय निकष सर्व उपस्थित पालकांना वाचून दाखविले.
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष शिवाजी पांडुरंग बोराडे, शिक्षक संतोष मंजुळे, केंद्राच्या कर्तव्यदक्ष केंद्रप्रमुख वंदना पांडव, दीपक लांडगे, पार्वती कुंभार, सविता चव्हाण आदी उपस्थित होते.
- भारत प्रायमरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी बनविले आकाश कंदील व भेटकार्ड
- सोलापूर सामाजिक वनीकरण विभागाकडुन आयोजित स्पर्धेत जेऊरच्या भारत हायस्कूलची आरूषी बादल प्रथम तर शिवानी कुंभार तृतीय
- स्वतःचा कारखाना विकणाऱ्या माजी आमदार शिंदे आणि त्यांच्या गटाने आदिनाथची काळजी करू नये- पाटील गट
- जेऊर येथील ओंकार पोळ याचे प्रथम पुण्यस्मरण ; केम व शेटफळ येथे विद्यार्थ्यांना भोजन व शालेय साहित्यांचे वाटप
- कोर्टीच्या सरपंच भाग्यश्री नाळे-मेहेर यांना ग्रामररत्न सरपंच पुरस्कार जाहीर

