08/06/2025

केम येथील शेतकऱ्याचा ‘महाराष्ट्र दिनी’ आत्महदहनाचा इशारा

0
IMG-20230425-WA0009.jpg

जेऊर, दि. 25 (करमाळा-LIVE)-
करमाळा तालुक्यातील केम येथील शेतकरी विकास लक्ष्मण जाधव यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, 30 जुलै 2022 रोजी टेंभूर्णी येथील श्रीराम ऑटोलाईन या शोरूम मधून शेतकरी विकास जाधव यांनी प्रित 955 नावाचा ट्रॅक्टर खरेदी केला होता. मात्र सदर ट्रॅक्टरचे पुढील काही दिवसात म्हणजेच 28 जुलै रोजी इंजिनचे काम निघाले, सदर शेतकरी जाधव हे तो ट्रॅक्टर घेऊन शोरूम ला गेले शोरूमने त्यांचे इंजिन काम करून तो ट्रॅक्टर त्यांना परत दिला. त्यानंतर तो ट्रॅक्टर 27 जानेवारी 2023 रोजी रात्री अचानक पेटला आणि त्यात त्याचे इंजिन जळून खाक झाले. त्यामुळे सदर शेतकऱ्याने पुन्हा ट्रॅक्टर शोरूमला आणून सोडला आणि ट्रॅक्टर भरपाईची मागणी केली. मात्र शोरुम मालकाने त्याला कोणत्याही प्रकारची भरपाई दिली नाही.

झालेल्या नुकसानीमुळे सदर शेतकऱ्याने आत्मदहनाचा इशारा दिला आहे. एकीकडे उष्णतेने शेकडो नागरिक प्राण गमवत आहेत. आणि दुसऱ्या बाजूला सदर जाधव कुटुंब उन्हात उपोषणाला बसले आहे. तसेच 1 मे महाराष्ट्र दिनी जाधव कुटुंब श्रीराम ऑटोलाईन टेंभुर्णी या शोरूम समोर पेट्रोल अंगावर ओतून आत्मदहन करणार असल्याचे पत्र त्यांनी दिले आहे.

मला माझ्या जळालेल्या ट्रॅक्टरच्या बदल्यात नवीन ट्रॅक्टर मिळवा किंवा मी भरलेले दोन लाख रुपये आणि भरलेला हप्ता तसेच ट्रॅक्टरवर असलेले कर्ज नील करून मिळावे अन्यथा मी माझ्या लहान मुलासह कुटुंबाला सोबत घेऊन 1 मे रोजी आत्मदहन करणार आहे.

विकास जाधव (ट्रॅक्टर मालक, शेतकरी)

विकास जाधव या ट्रॅक्टर मालकाने इन्शुरन्स कंपनीने मागितलेल्या कागदपत्रांची पूर्तता केली नाही. त्यामुळे सदर ट्रॅक्टरची भरपाई इन्शुरन्स कंपनी देऊ शकली नाही.

नाना देवकर (शोरुम चालक)

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page