17/12/2024

आमदार असताना पश्चिम भागातील अनेक रस्त्यांचे प्रश्न मार्गी लावले- माजी आमदार नारायण आबा पाटील

0
IMG-20230624-WA0023.jpg

करमाळा, दि. 24 (करमाळा-LIVE)-
जल-जीवन मिशन योजने अंतर्गत ग्रामपंचायत केत्तूर नं-१ अंतर्गत ७६ लक्ष ५० हजार इतका निधी मंजूर झाला असून या कामाचा भूमिपूजन व उदघाटन माजी आमदार नारायण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.

यावेळी बोलताना माजी आमदार नारायण पाटील म्हणाले की, भविष्यातील पंचवीस वर्षांचा विचार करून ही जलजीवन योजनेची मंजूरी करण्यात आली असून शासनाचे डोळ्यासमोर एकच उदिष्ट असून प्रत्येक खेडेगावात ही योजना राबवून “हर घर नळ योजनेतून “एकही कुटुंब पाण्यावाचून वंचित राहणार नाही. ही योजना यशस्वी करण्याचं काम शासनाने केले आहे. पश्चिम भागातील रस्त्याचे अनेक प्रश्न मी आमदार असताना मार्गी लावले त्यांचबरोबर तुमचा केत्तूर नदीवरील पूल माझ्या कारकिर्दीत पूर्ण करण्याचं पुण्य तुमच्या किर्तेश्वरांच्या आशीर्वादाने यशस्वी झालं हे माझं भाग्य आहे. पुढील येणाऱ्या काळात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून तालुक्यातील विविध कामे मार्गी लावण्यासाठी मी प्रयत्नशील असणार आहे. गेल्याच महिन्यात मुख्यमंत्री यांना विनंती करून तालुक्यातील रस्त्यांवर आसलेली स्थगिती उठवण्यात आपल्याला यश आलं असून त्या रस्त्यापैकी केत्तूर 2 ते पोमलवाडी रस्त्यावरील स्थगिती उठल्याने त्या रस्त्याचे काम थोड्याच दिवसात चालू होईल. केत्तूर -2 ते वाशिंबे चौफुला या रस्त्यासाठी सध्या मुख्यमंत्री साहेब व ग्रामविकास मंत्री यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा चालू असून हा ही रस्त्याचा विषय लवकरच मार्गी लावू असे सांगितले.

यावेळी उपस्थितीत आदिनाथ चे माजी संचालक नवनाथ झोळ, माजी उपसभाती दत्ता सरडे, माजी सभापती शेखर गाडे, माजी सभापती बापूसाहेब पाटील, माजी सरपंच उदयसिंह पाटील, माजी उपसरपंच चिंतामणी कानतोडे, माजी उपसरपंच छाया शंकर राऊत, श्रीमती साळूबाई पोपट येडे, भीमराव येडे, रामचंद्र कोकणे, राजेश कानतोडे, दादासाहेब कानतोडे, शहाजी पाटील, विकास जरांडे, बाळासो जरांडे, बाळासो ठणके, नानासो पवार, बाळासाहेब गावडे, शंकर कानतोडे, किराण निंबाळकर, माणिक राऊत, लालासाहेब कोकणे, राजाराम येडे, बाळासाहेब देवकर, राजेंद्र माळवे, शैलेश कानीचे, रामभाऊ कानतोडे, हनुमंत राऊत, छगन कोकणे, बाळासो कोकणे, रामदास राऊत, छगन मिंड, विलास राऊत, बाळासो जरांडे, आबासो ठोंबरे, दत्तात्र्यय कोकणे, उदय पाटील, सुभाष पाटील, बाळासाहेब भरणे, आबासाहेब येडे, हनुमंत गुलमर, बापूसाहेब कोकणे, डॉ.भानुदास राऊत, रामभाऊ नजरकार, सागर कोकणे, सचिन जरांडे, संतोष कनीचे, श्रीराम मिंड, पृथ्वीराज कानतोडे, धनजी येडे, दीपक वेळेकर, पोपट राऊत, सतीश खाटमोडे, जनार्धन कानतोडे, शहाजी कोकणे, औदुंबर कोकणे, प्रशांत बागल, अमोल पाटील, युवराज देवकर, राजू खटके, अक्षय देवकर, चंद्रकांत देवकाते उपस्थितीत होते.

कार्यकामाचे सूत्रसंचालन नानासाहेब पवार यांनी केले व आभार बापूसाहेब पाटील यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हेही वाचा….

You cannot copy content of this page