केत्तूर ग्रामपंचायत निवडणुकीत महिला प्रतिनिधींना संधी दिल्यास बिनविरोध साठी पाठिंबा- माजी सरपंच उदयसिंह मोरे-पाटील

केत्तूर, दि. 10 (करमाळा-LIVE)-
केत्तूर ग्रामपंचायत निवडणुकीत महिला प्रतिनिधींना संधी दिल्यास माझा बिनविरोध साठी पाठिंबा राहील असे मत माजी सरपंच उदयसिंह मोरे-पाटील यांनी व्यक्त केले आहे.
केत्तूर ग्रामपंचायत निवडणुकीत अकरा सदस्यांसह सरपंच पदासाठी महिला प्रतिनिधींना संधी मिळत असल्यास निवडणुकीसाठी पाठिंबा देणार आहे. गाव पातळीवर ज्यांनी विविध पदावर काम केले आहे. त्यांनी संधी घेऊ नये गावाने या आगोदर विविध सामाजिक कामा मध्ये एकी दाखवली आहे त्या मध्ये केत्तूर नं १ व केत्तूर नं २ उजनी जलाशावरील पूल, तेरा कोटी नाम जप यज्ञ असेल किंवा श्री किर्तेश्वर देवस्थान परिसर सुशोभिकरण किंवा कलशारोहणाचा भव्य कार्यक्रम असेल असे कामे केली असताना ग्रामपंचायत निवडणूक नक्कीच बिनविरोध होईल अशी आशा आहे.
परंतु महिला प्रतिनिधींना संधी दिल्यास बिनविरोध निवडणूकीस माझा पाठिंबा आहे. असे श्री मोरे-पाटील यांनी सांगितले.
केत्तूर गावाचा हिवरेबाजार, पाटोदा, राळेगणसिद्धी सारखा विकास झाला पाहिजे गावाला जोडणारे रस्ते, गावाअंतर्गत रस्ते, वीज, पाणी या मुलभूत गरजा मुलभूत गरजा पूर्ण झाल्या पाहिजेत पश्चिम भागातील सर्वात मोठ्ठी बाजार पेठ म्हणून तालुक्यात केत्तूर ची ओळख आहे परंतु असे असताना बाजार पेठचे गावालारस्ते चांगले नसल्याने आर्थिक नुकसान झाले आहे. केवळ राजकीय इच्छा शक्ती चांगली नसल्याने हे होत आहे. रेल्वे स्टेशन वर सुपरफास्ट गाड्यांचा थांबा मिळत नाही. या सर्व समस्या वर उपाय म्हणून गावचे कारभारी चांगले काम करणारे असावेत. केत्तूर ने तालुक्याचे नेतृत्व केले असून कै.रावसाहेब भगवानराव पाटील यांनी आमदार, आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, करमाळा पंचायत समितीचे सभापती म्हणून तर बापूसाहेब साहेबराव पाटील यांनी करमाळा पंचायत समितीचे सभापती म्हणून काम केले आहे. आता राजेंद्रसिंह रामराव पाटील हे सोलापूर जिल्हा दूध संघाचे संचालक आहेत, अशी उज्वल परंपरा गावाला असताना होऊ घातलेली ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध करून महिला प्रतिनिधींना संधी देऊन महाराष्ट्रात गावाचे नाव झळकवण्याची संधी सर्व केत्तूरकरांना मिळाली आहे.


- दहिगावं उपसा सिंचन योजनेची सर्व बिल आकारणी पुर्वरत ; आवर्तन वाढीस मदत मिळणार- आमदार नारायण आबा पाटील
- शेटफळ येथे कृषी विभागाच्या वतीने शिवार फेरीचे आयोजन ; महिलांना दिले प्रशिक्षण
- करमाळा नगरपालिका निवडणूक : प्रभाग क्रमांक पाच मध्ये जगताप विरूद्ध जगताप ‘काटे की टक्कर’
- ३० नोव्हेंबरला कोर्टी येथे मोफत मुळव्याध उपचार शिबीराचे आयोजन
- केळी उत्पादकांना न्याय मिळवून देण्यासाठी आमदार नारायण आबा पाटील अग्रेसर ; विरोधकांचे निवेदन म्हणजे वराती मागून कागदी घोडे- प्रवक्ते सुनील तळेकर
