केत्तूर ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करा- निवृत्त पोलीस अधीक्षक मालोजीराव पाटील


केत्तूर, दि. 6 (करमाळा-LIVE)-
केत्तूर ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करा अशी मागणी निवृत्त पोलीस अधीक्षक मालोजीराव पाटील यांनी केली आहे.
करमाळा तालुक्यातील केत्तूरची ग्रामपंचायत निवडणूक लागलेली असून तालुक्यातील इतर गावांच्या तुलनेत केत्तूर गावचा विकास झाला नसून दोन्ही गावांना पक्के रस्ते नाहीत. गावात राजकीय मत भिन्नता असल्याने गावातील पुढाऱ्यांना तालुक्यातील नेते मंडळी किंमत देत नाहीत. असे असताना प्रभागातील सदस्य वारंवार त्याच त्याच घरातील निवडून येत आहेत. आठवी ते नववी शिक्षण घेतले असल्याने त्यांना कायदे विषयक ज्ञान कमी असल्याने गावचा विकास थांबला असल्याचे श्री पाटील यांनी सांगितले.
ग्रामपंचायत निवडणूक ही गावच्या भविष्या दृष्टीने महत्त्वाची असून गावातील युवकांनी निवडणूक बिनविरोध करण्याचे ठरवले आहे त्यास आपला पाठिंबा आहे. कमी शिकलेली प्रतिनिधी न पाठवता जास्तीत जास्त उच्च शिक्षकीत महीलांना येणाऱ्या सदस्या मंडळ मध्ये स्थान द्यावे. मी राहत असलेल्या प्रभाग बिनविरोध करणे साठी प्रयत्न करणार असल्याचे श्री पाटील यांनी सांगितले.
- भारत प्रायमरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी बनविले आकाश कंदील व भेटकार्ड
- सोलापूर सामाजिक वनीकरण विभागाकडुन आयोजित स्पर्धेत जेऊरच्या भारत हायस्कूलची आरूषी बादल प्रथम तर शिवानी कुंभार तृतीय
- स्वतःचा कारखाना विकणाऱ्या माजी आमदार शिंदे आणि त्यांच्या गटाने आदिनाथची काळजी करू नये- पाटील गट
- जेऊर येथील ओंकार पोळ याचे प्रथम पुण्यस्मरण ; केम व शेटफळ येथे विद्यार्थ्यांना भोजन व शालेय साहित्यांचे वाटप
- कोर्टीच्या सरपंच भाग्यश्री नाळे-मेहेर यांना ग्रामररत्न सरपंच पुरस्कार जाहीर

