06/06/2025

कोंढेज: आदलिंग वस्ती येथे सावित्रीमाई फुले यांची जयंती साजरी

0
IMG-20230103-WA0028.jpg

जेऊर, दि. 4 (करमाळा-LIVE)-
मुलींना दिली सावित्री आई सावली, अशी हि थोर माऊली. सावित्रीमाई फुलेंच्या कार्याला. सलाम पावलो पावली. स्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या भारतीय पहिल्या महिला शिक्षिका शिक्षण प्रसारक तथा समाज सुधारक सावित्रीबाई फुले यांची जयंती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आदलिंग वस्ती कोंढेज येथे विविध उपक्रमांनी व मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

शाळेतील मुलींनी गायनातून सावित्रीबाई फुले यांच्या थोरवी सांगितली. यावेळी शालेय साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी सचिन गारूडी, भागवत मेहेर, आप्पा शिरसकर, विकास सोसायटीचे सदस्यरामचंद्र आदलिंग, राजू पिसे, सुहास गायकवाड, महादेव शिंदे, शिरसकर मेजर तसेच शिक्षका सुनंदा फटके, सिंधुबाई राऊत, आशा वर्कर, मनिषा आदलिंग, कोमल आरणे, मनिषा आदलिंग, सोनाली आदलिंग आदी मान्यवर उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page