07/06/2025

कोंढेज : आदलिंग वस्ती शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी श्री आरणे तर उपाध्यक्षपदी सौ आदलिंग यांची निवड

0
IMG-20231005-WA0049.jpg

जेऊर, दि. 5 (करमाळा-LIVE)-

करमाळा तालुक्यातील कोंढेज येथील आदलिंग वस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी ज्ञानदेव आरणे तर उपाध्यक्षपदी मनिषा आदलिंग यांची बिनविरोध निवड झाली आहे.

त्याच बरोबर सोनाली सुनिल आदलिंग, योगिता किशोर आदलिंग, सुवर्णा हरिदास ननवरे, सारिका जालिंदर आदलिंग, महेश बबन आदलिंग, माधव शरद आदलिंग, विनोद मोहन आदलिंग यांची संचालकपदी यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर विद्यार्थी प्रतिनिधी सार्थक हरिदास आदलिंग, अनुराधा औदुंबर आदलिंग यांची निवड झाली आहे.

जिल्हा परिषद शाळा आदलिंग वस्ती येथे आज झालेल्या पालक सभेमध्ये सर्व पालकांनी एकमताने निवडी करण्यात आल्या बैठकीला कोंढेज गावचे सरपंच जालिंदर आदलिंग, मुख्याध्यापक केकान सर, उपशिक्षका सुनंदा फाटके व सर्व पालक उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page