08/06/2025

कोंढेज येथील जीवन लोंढे याची ‘कर सहाय्यक’ पदी निवड

0
IMG-20230916-WA0031.jpg

जेऊर, दि. 16 (करमाळा-LIVE)-
करमाळा तालुक्यातील कोंढेज येथील रहिवासी आणि माजी सैनिक खंडू लोंढे यांचे सुपुत्र जीवन खंडू लोंढे याची कर सहाय्यक पदी निवड झालेली आहे.

2022 मध्ये एमपीएसस्सी (MPSC) मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत यश मिळविलेले आहे. जीवन याचे प्राथमिक शिक्षण कोंढेज येथील जिल्हा परिषद शाळेत झालेले असून माध्यमिक 5 वी ते 10 वी जेऊर मधील भारत हायस्कूल मध्ये झालेले आहे, तर अकरावी व बारावी पंढरपूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात झालेले आहे. तसेच कॉम्प्यूटर इंजिनियरींग कोल्हापूरातील कोल्हापूर इंस्टीट्यूट आॕफ टेक्नोलॉजी येथे झालेले आहे.

लहानपणापासूनच प्रशासकीय सेवेत काम करण्याचा मानस होता, हेच ध्येय समोर ठेवून यश संपादन केल्याची माहिती जीवन लोंढे यांने निवडीवेळी बोलताना सांगितले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page