06/06/2025

कोंढेज : आदलिंग वस्ती येथील जिल्हा परिषद शाळेत सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

0
IMG-20250104-WA0024.jpg

करमाळा, दि. ४ (करमाळा-LIVE)-
जिल्हा परिषद शाळा आदलिंग वस्ती येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिका दिन व किशोरी मेळावा म्हणून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कोमल आरणे तर प्रमुख पाहुणे म्हणून कोंढेज गावच्या सरपंच सारिका आदलिंग उपस्थित होत्या तसेच आदलिंग वस्तीवरील सर्व माता किशोरवयीन बालिका व पालक वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते या इयत्ता पहिली ते चौथीच्या मुलींनी व माता पालकांनी सावित्रीबाई फुले व क्रांतीज्योती महात्मा फुले यांच्या कार्याचे महत्त्व सांगणारे मनोगत तसेच समुहनृत्य सादर केले.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने आशासेविका मनिषा आदलिंग यांनी किशोरवयीन मुलींसाठी विशेष मार्गदर्शन केले. यावेळी रांगोळी स्पर्धा, चमचा लिंबू स्पर्धा, संगीत खुर्ची उखाणे स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.

एवरेस्टवीर शिवाजी ननवरे यांच्याकडून मुलांसाठी खाऊ व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक कुंडलिक केकान यांनी तर आभार प्रदर्शन सुनंदा फाटके यांनी केले.

यावेळी अंगणवाडी सेविका मंगल आदलिंग व मदतनीस सिंधू राऊत मोहिनी आदलिंग, योगिता आदलिंग सुवर्णा ननवरे, प्रियंका आदलिंग सविता आदलिंग, सोनाली आदलिंग, मालनआदलिंग, सपना आदलिंग, नेहा आरणे, भारत आदलिंग उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page