कुगावं ग्रामपंचायतच्या वतीने महिलांना ब्युटी पार्लर आणि टेलरिंगचे प्रशिक्षण



करमाळा, दि. 18 (करमाळा-LIVE)-
करमाळा तालुक्यातील कुगांव ग्रामपंचायतच्या वतीने महिलांना ब्युटी पार्लर आणि टेलरिंग चे प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाला.
गावातील महिलांना रोजगाराची संधी निर्माण व्हावी म्हणून कुगावं ग्रामपंचायत व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला प्रशिक्षण अभियान संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमांमध्ये गावातील व आसपासच्या परिसरातील शंभर महिलांनी सहभाग नोंदवला. हे प्रशिक्षण दोन टप्प्यात पार पडले. सकाळी शिलाईचे प्रशिक्षण दिले गेले तर दुपारी ब्युटी पार्लर चे प्रशिक्षण दिले.
सदरील प्रशिक्षण देण्यासाठी निशिगंधा शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आले. 2 डिसेंबर पासून चालू असलेल्या या प्रशिक्षणाचा समारोह काल रविवारी झाला.
यावेळी विद्यमान सरपंच सुवर्णा महादेव पोरे, उपसरपंच प्रकाश डोंगरे व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी माजी सरपंच कौशल्य कामटे, रेश्मा डोंगरे, आशा कामटे, आस्मा सय्यद, नवनाथ अवघडे, उदध्व गावडे, तुकाराम हवालदार, आजिनाथ भोसले, महादेव बल्लाळ व यावेळी ग्रामसंघाचे पदाधिकारी आणि महिला बचत गटातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. सीआरपी वंदना झिंजुर्डे यांच्या सहकार्याने हे प्रशिक्षण उत्तम रित्या पार पडले.
- भारत प्रायमरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी बनविले आकाश कंदील व भेटकार्ड
- सोलापूर सामाजिक वनीकरण विभागाकडुन आयोजित स्पर्धेत जेऊरच्या भारत हायस्कूलची आरूषी बादल प्रथम तर शिवानी कुंभार तृतीय
- स्वतःचा कारखाना विकणाऱ्या माजी आमदार शिंदे आणि त्यांच्या गटाने आदिनाथची काळजी करू नये- पाटील गट
- जेऊर येथील ओंकार पोळ याचे प्रथम पुण्यस्मरण ; केम व शेटफळ येथे विद्यार्थ्यांना भोजन व शालेय साहित्यांचे वाटप
- कोर्टीच्या सरपंच भाग्यश्री नाळे-मेहेर यांना ग्रामररत्न सरपंच पुरस्कार जाहीर

