कुंभेज : चांदणे वस्ती येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी
करमाळा, दि. 3 (करमाळा-LIVE)-
करमाळा तालुक्यातील कुंभेज येथील चांदणे वस्ती येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०३ वी जयंती साजरी करण्यात आली.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी फक्त दीड दिवस शाळेत जाऊन साहित्यरत्न लोकशाहीर झाले, अण्णाभाऊ साठे थोर समाजसुधारकांपैकी एक समाज सुधारक होते, अण्णाभाऊ साठे थोर समाजसुधारक होतेच त्याचबरोबर ते एक साहित्यक, कथालेखक, कांदबरीकर होते, त्यांनी कांदबरी, कथा, व्यतिरिक्त पोवाडे, लावणी, अशा विविध साहित्य प्रकारात विपुल लेखन केले त्यांनी लिहिलेल्या काही कादंबरीवर चित्रपट निर्माण झाले, त्यांनी लिहिलेल्या फकिरा
या कादंबरीला राज्य शासनाकडून सर्वोत्कृष्ट कांदबरी म्हणून गौरविण्यात आले.
अशा या थोर समाजसुधारक साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती कुंभेज चांदणे वस्ती येथे सर्व मातंग समाज बांधवांनी एकत्रित येऊन मोठ्या संख्येने, उत्साहाने, आनंदाने ही जयंती साजरी करण्यात आली. यावेळी चांदणे वस्ती वरिल सर्व समाज बांधव व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.