11/04/2026

वैष्णवी, सुचिता अन् रोहित यांची पोलिस दलात निवड ; तिघांचा कुंभेज येथे सन्मान

0
IMG-20260411-WA0038.jpg

कुंभेज, दि. ११ (करमाळा-LIVE)-
पोलिस दलात निवड झाल्याबद्दल वैष्णवी मुटके , सुचिता वाघमारे व रोहित चौगुले यांचा कुंभेज ग्रामस्थांच्या वतीने उत्साहात भव्य सत्कार करण्यात आला. कु. वैष्णवी मुटके व सुचिता वाघमारे या दोघींनी भूम ( धाराशिव) येथील थ्री एस करीअर अकॅडमी येथून सराव केला. या दोघींची पुणे शहर पोलीस दलात निवड झाली तर रोहित चौगुले याने शिवतेज अकॅडमी बारामती येथे सराव केला. त्याची नवी मुंबई पोलीस दलात निवड झाली आहे.

करमाळा पंचायत समितीचे माजी उपसभापती तथा अक्कलकोट स्वामी समर्थ देवस्थानचे विश्वस्त श्री. भारतराव शिंदे व ग्रामपंचायत सदस्य भागवत कादगे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र अकॅडमीचे प्रशिक्षक वायकर, वैष्णवीचे वडील तात्यासाहेब मुटके तसेच रोहितचे वडील बाबासाहेब चौगुले यांचाही सन्मान करण्यात आला.

या सत्कार समारंभात श्री. कल्याणराव साळुंके सर, महाराष्ट्र करिअर अकॅडमीचे पांडुरंग वायकर सर तसेच आजी-माजी सैनिक मंडळाचे अध्यक्ष मेजर अक्रूर शिंदे यांनी मनोगत व्यक्त करत यशस्वी उमेदवारांचे कौतुक केले व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

ग्रामदैवत ज्योतिर्लिंग मंदिर कुंभेज येथे आयोजित या समारंभास ग्रामस्थांची मोठी उपस्थिती लाभली.
या समारंभास कुंभेजचे माजी सरपंच दत्तात्रय शिंदे, पै. अगस्ती मुटके, चेअरमन युवराज भोसले, मेजर अक्रूर शिंदे, पै. अण्णासाहेब साळुंके, अनिल कादगे, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे गणेश शिंदे, सुरेश शिंदे, अमोल मुटके, किसन शिंदे, पैगंबर पठाण, राजेंद्र शिंदे, दिलीप पवळ, रामभाऊ मोरतळे, अण्णासाहेब कादगे, अमीन पठाण, डॉ. अर्जुन शिंदे, पो.कॉ. मंगेश मुटके, मेजर किरण मोहिते, सोमनाथ शिंदे, जयसिंग मुटके, संतोष घोरपडे, सुरज चौगुले, सागर चौगुले, संतोष चौगुले, बापू पठाण, संतोष चांदणे, तसेच पुजारी नाना कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल मुटके सर यांनी केले, तर आभार गणेश शिंदे साहेब यांनी मानले.

गावाचा अभिमान वाढवणारी कामगिरी-
वैष्णवी मुटके व रोहित चौगुले यांच्या यशामुळे कुंभेज गावाचा तसेच सुचिता वाघमारेच्या यशामुळे वरकटणे गावची मान उंचावली असून युवकांसाठी त्यांनी प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page