लोकनेते स्व.दिगंबरराव बागल यांच्या जयंती निमित्त आयोजित कृषी महोत्सवाच्या पुस्तिकेचे प्रकाशन
करमाळा, दि. 2 (करमाळा-LIVE)-
लोकनेते स्व. दिगंबररावजी बागल मामा यांच्या 68 व्या जयंतीच्या निमित्ताने आयोजित कृषी महोत्सवाच्या निमित्ताने रंगीत माहिती पुस्तिकेचे प्रकाशन माढा प्रांताधिकारी ज्योती कदम तहसीलदार समीर माने, गटविकास अधिकारी मनोज राऊत, मुख्याधिकारी बालाजी लोंढे, साखर संघाच्या संचालिका रश्मी दिदी बागल, विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे, मार्केट कमिटीचे चेअरमन शिवाजीराव बंडगर, व्हाईस चेअरमन चिंतामणी दादा जगताप, आदिनाथ चे चेअरमन धनंजय डोंगरे यांच्या उपस्थितीत आज तहसील कार्यालय करमाळा येथे करण्यात आले.
यावेळी विजयराव पवार, पत्रकार विशाल घोलप, सुहास घोलप, शितल कुमार मोठे, अशोक मुरूमकर, अॕड. सचिन हिरडे आदी मान्यवर उपस्थित होते.