विष मुक्त अन्नाचा संदेश: जेऊरच्या लिटिल एंजल्स स्कूल मध्ये भरला “बाल महोत्सव


जेऊर, दि. 15 (करमाळा-LIVE)-
करमाळा तालुक्यातील जेऊर येथे आज 13 जानेवारीला जय मातृभूमी सांस्कृतिक आणि शैक्षणिक संघ संचलित लिटिल एंजल्स स्कूल आणि अटल ज्ञान प्रबोधिनी या शाळेमध्ये जिजाऊ जन्मोत्सव आणि स्वामी विवेकानंद जन्मदिन यानिमित्ताने बाळ गोपाळांच्या संक्रांति निमित्त आवश्यक असणाऱ्या वस्तूंचा छोटा बाजार “बाल महोत्सव” आयोजित करण्यात आला होता.
यावेळी आनंदी बाजार बाजारातील सेंद्रिय भाजीपाला फळे व धान्याला लोकांची मोठी मागणी बाजाराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी दिला विषमुक्त शेती पिकवण्याचा संदेश दिला. येथील लिटल एंजल स्कूल व अटल ज्ञानप्रबोधिनी शाळेच्या आवारात या शाळेच्या विद्यार्थ्यांनी सेंद्रिय आनंदी बाजाराचे आयोजिन केले होते. या बाजाराचे उद्घाटन ज्येष्ठ नागरिक बबन मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. या बाजारात रासायनिक खताचा वापर न करता पिकविलेल्या पालेभाज्या फळे व धान्याची विक्री विद्यार्थ्यांनी केली सेंद्रिय पद्धतीने पिकवलेली केळी, जोडगव्हू, ऊस, गुळ, काकवी फळे व भाजीपाला यांना मोठी मागणी होती. तर खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना विद्यार्थी रासायनिक खताच्या आतिरेऊ वापराचे दुष्परिणाम समजावून सांगत आरोग्यासाठी गरजेच्या सेंद्रिय शेतीचे महत्व पटवून देत होते. याशिवाय घरी बनवलेली लस्सी, थंडाई, केळी वेफर्स, पॉपकॉर्न याचीही मोठ्या प्रमाणावर विक्री झाली. इतर ठिकाणाहून खरेदी करून आणलेल्या वस्तू विक्री पेक्षा स्वतःच्या शेतातील भाजीपाला आणि स्वतःच्या घरी बनवलेली वस्तू या बाजारात विक्री होत्या हे या बाजाराचे फार मोठे वैशिष्ट्य मानता येईल.
बाल महोत्सवाला व्यापारी संदीप कोठारी, परेशकुमार दोशी, साखर कारखान्याचे संचालक पांडूरंग जाधव, संभाजी ब्रिगेडचे नितीन खटके, बालाजी गावडे, पत्रकार गजेंद्र पोळ,अश्यपाक सय्यद, वैभव पोळ, निलेश पाटील, उमेश पाथ्रुडकर, शहाजी राऊत, नितीन मेहता, उपक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे प्रसन्न बलदोटा, सुभाष इंगोले मुख्याध्यापिका शर्मिला फाटके रूक्मिणी साळूंके सर्वं शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

- भारत प्रायमरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी बनविले आकाश कंदील व भेटकार्ड
- सोलापूर सामाजिक वनीकरण विभागाकडुन आयोजित स्पर्धेत जेऊरच्या भारत हायस्कूलची आरूषी बादल प्रथम तर शिवानी कुंभार तृतीय
- स्वतःचा कारखाना विकणाऱ्या माजी आमदार शिंदे आणि त्यांच्या गटाने आदिनाथची काळजी करू नये- पाटील गट
- जेऊर येथील ओंकार पोळ याचे प्रथम पुण्यस्मरण ; केम व शेटफळ येथे विद्यार्थ्यांना भोजन व शालेय साहित्यांचे वाटप
- कोर्टीच्या सरपंच भाग्यश्री नाळे-मेहेर यांना ग्रामररत्न सरपंच पुरस्कार जाहीर


