17/12/2024

लोकमंगल पतसंस्थेच्या जेऊर शाखेच्या वतीने वांगी-३ येथे जागतिक महिला दिन साजरा

0
IMG-20240308-WA0042.jpg

जेऊर, दि. ९ (करमाळा-LIVE)-
लोकमंगल पतसंस्थेच्या जेऊर शाखेच्या वतीने समृद्ध गाव अभियानासाठी निवडण्यात आलेल्या वांगी नं-३ येथे जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ५ महिलांचा लोकमंगल परिवाराच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख मान्यवर, सत्कार मुर्ती व उपस्थित महिलांचे शाखेच्या वतीने स्वागत करण्यात आले. त्यानंतर राजमाता जिजाऊ साहेब व शिक्षणाच्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

यावेळी प्रमुख पाहुण्या व मार्गदर्शिका म्हणून भारत महाविद्यालयाच्या प्रा. सुनिता कांबळे उपस्थित होत्या.

यावेळी कळसाईत विमल (शैक्षणिक क्षेत्र), कांबळे सुवर्णा (राजकीय क्षेत्र), बेंद्रे वैष्णवी (स्पर्धा परीक्षा -नेट उत्तीर्ण), रोकडे सुप्रिया (MPSC उत्तीर्ण- MIDC उपसंचालक), हर्षाली नाईकनवरे (कृषी क्षेत्र) या महिलांचा शाल, श्रीफळ, गुलाब पुष्प व अहवाल देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी उपस्थित महिलांना आर डी स्कीम व लोकमंगल विषयी माहिती दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हेही वाचा….

You cannot copy content of this page