जेऊरच्या लोकमंगल पतसंस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

जेऊर, दि. १५ (करमाळा-LIVE)-
जेऊर येथील लोकमंगल पतसंस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.
अनेक वर्षांंपासून लोकमंगल परिवार कोणत्याही सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असतो. गेल्या वर्षी लोकमंगल समुहाने रौप्य महोत्सवी वर्षे साजरे केले. गेली २५ वर्षे या परिवाराचे संस्थापक अध्यक्ष माननीय सुभाष बापु देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी वाटचाल चालू आहे. गेल्या २५ वर्षापासून लोकमंगल परिवार समाजातील विविध घटकांना सोबत घेऊन काम करताना दिसतो.
जरवर्षी प्रमाणे यावर्षीही जेऊरच्या शाखेत दहावी आणि बारावीच्या यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन व मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना भेटवस्तू, गुलाबपुष्प, अहवाल देऊन अभिनंदन करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी शाखेचे सल्लागार, सभासद, विद्यार्थी, पालक, विभागीय अधिकारी, शाखाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
या कार्यक्रमात पुढीलप्रमाणे गुणवंतांचा सन्मान करण्यात आला-
1) पोळ नम्रता:-87.33%
2) नलवडे गणेश:-90.40%
3) कोकीळ ज्ञानेश्वरी:-79%
4) शिंदे सायली:-76.68%
5)पोळ करणं :- 75.33%