लोकनेते स्व दिगंबररावजी बागल पतसंस्थेच्या चेअरमनपदी गजेंद्र पोळ

करमाळा, दि. १५ (करमाळा-LIVE)-
लोकनेते स्व. दिगंबररावजी बागल सहकारी नागरी पतसंस्थेच्या चेअरमनपदी पत्रकार गजेंद्र पोळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
करमाळा तालुक्यातील स्व लोकनेते दिंगबरराव बागल पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक जाहीर करण्यात आली होती. भारतीय जनता पक्षाच्या महिला प्रदेश उपाध्यक्ष रश्मी बागल व युवानेते दिग्विजय बागल यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या निवडणुकीत गजेंद्र पोळ, गोरख काकडे, जलाल पटेल, अमोल दौंडे, दत्तात्रय बारवकर, तात्या बागल, सारिका ठोसर, शैला भोसले, शरद जगताप, लक्ष्मण खोमणे, विकास भोसले यांची बिनविरोध संचालक पदी निवड झाली होती.
तालुका उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयात नवनिर्वाचित संचालक मंडळाच्या बैठकीत गजेंद्र पोळ यांची चेअरमनपदी बिनविरोध निवड करण्यात आली तर लक्ष्मण खोमणे यांची सचिवपदी निवड करण्यात आली.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उमेश बेंडारी यांनी काम पाहिले. नवनिर्वाचित चेअरमन सचिव व संचालक मंडळांचा सन्मान माजी आमदार श्यामल बागल यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मकाईचे चेअरमन दिनेश भांडवलकर, संचालक गणेश झोळ, मुख्य शेतकी अधिकारी शिवाजी कदम, सतीश अनपट, बबलू कांबळे, अनिल पवार, प्रविण यादव, अनिल वायकर, मोहन यादव, सुरज काळे, गणेश अंधारे यांच्यासह मकाई कारखान्याचे कर्मचारी उपस्थित होते.