महायुतीचे उमेदवार दिग्विजय बागल यांना प्रहार जनशक्ती संघटनेचा पाठिंबा- जिल्हाप्रमुख दत्तात्रय महादेव मस्के-पाटील यांची माहिती
करमाळा, दि. १५ (करमाळा-LIVE)-
महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार दिग्विजय दिगंबरराव बागल यांच्याकडे आपल्या मतदारसंघाचा व सर्वसामान्य जनतेचा विकास करण्याची क्षमता असून तालुक्यातील समस्या विधानसभेत मांडून सर्वसामांन्यांचे प्रश्न सोडवू शकतात अशी खात्री आणि विश्वास आम्हाला आहे यासाठी आम्ही सर्व पदाधिकारी मा.दिग्विजय भैय्यांना निवडूण आणणार असा ठाम निर्धार यावेळी त्यांनी व्यक्त केला.
सोलापूर जिल्हातील तसेच करमाळा तालुक्यातील प्रहार संघटनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष दत्तात्रय मस्के पाटील, युवक अध्यक्ष युनूस पठाण, तालुका अध्यक्ष सोमनाथ जाधव, महिला ता. अध्यक्षस्वाती गोरे, युवा ता. अध्यक्ष विकी मोरे, युवक उपाध्यक्ष पप्पू ढवळे, जेऊर शहर अध्यक्ष राहूल निमगिरे, अपंग क्रांती ता. अध्यक्ष संतोष कुंभार यांचेसह सर्व कार्यकर्त्यानी पाठिंबा जाहीर केल्याबद्दल भाजपा प्रदेश उपाध्यक्षा रश्मी दिदी साहेब बागल यांनी प्रहार संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले.