मकाई साखर कारखान्याची निवडणूक जाहीर; 16 जूनला मतदान
करमाळा, दि. 12 (करमाळा-LIVE)-
करमाळा तालुक्यातील मकाई साखर कारखान्याच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.
सदरील निवडणूक 5 गटांतून 11 तर इतर पाच गटांतून 6 अशा एकूण 17 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सोपान टोणपे यांनी दिली आहे.
यामध्ये ऊस उत्पादक गट भिलारवाडी- 2 जागा
पारेवाडी गट- 3 जागा
चिखलठाण गट- 2 जागा
वांगी गट- 2 जागा
मांगी गट – 2 जागा
राखीव मतदार संघामध्ये
बिगर उत्पादक सहकारी व पणन संस्था – 1 जागा
महिला राखीव- 2 जागा
अनुसूचित जाती – 2 जागा
मागासवर्गीय – 1 जागा
भटक्या विमुक्त – 1 एक जागा
अशा 17 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे.
या निवडणुकीसाठी दि. 12 ते 18 मे, सकाळी 11 ते 3 वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र भरता येणार आहेत. 19 मे रोजी नामनिर्देशन पत्रांची छाननी होऊन 22 मे रोजी ग्राह्य नामनिर्देशन पत्रांची यादी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनात प्रसिद्ध करण्यात येईल.
दि. 22 मे ते 5 जून या कालावधीत 11 ते 3 वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र मागे घेण्याचा कालावधी असणार आहे. 6 जून रोजी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल. 16 जूनला मतदान झाल्यानंतर 18 जूनला मतमोजणी होऊन निकाल घोषित करण्यात येणार आहे.