06/06/2025

आमदार संजयमामा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ‘संकल्प वृक्षारोपनाचा- गौरव संजयमामांचा’ उपक्रमाचे आयोजन

0
IMG-20240615-WA0036.jpg

करमाळा, दि. १६ (करमाळा-LIVE)-
आमदार संजयमामा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ‘संकल्प वृक्षारोपनाचा- गौरव संजयमामांचा’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आमदार शिंदे यांचे स्विय सहाय्यक प्रा. विकास वीर यांनी दिली आहे.

तापमान खूप वाढलंय, उन्हामुळे हैराण झालोय, उन्हाळा कडक चाललाय ही वाक्य आपण ऐकतो. जून सुरू होतोय. दोन झाडे लावा, चार झाडे लावा, मेसेज पाठवा हे सगळं आपण पाहतो, ऐकतो, वाचतो पण या दृष्टीने आपण प्रयत्न करत नाही. आपल्याला आपल्या गावापुरतं काही करता येईल का हा विचार आपण करत नाही. आपल्याला आपले गाव हरित बनवायचे असेल तर त्या पद्धतीने काय नियोजन करता येईल ? सरकारी जागा, रस्त्याच्या बाजूला असलेल्या जागा, गावातील रिकाम्या जागा, गायरान अशा जागेवरती आपण झाडे लावली आणि जगवली तर आपलं गाव हरित व्हायला वेळ लागणार नाही. मग थांबायचे कशाला ? यावर्षी पाऊसकाळही चांगला आहे.

म्हणूनच येत्या ३१ जुलैला आमदार संजयमामा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ‘संकल्प वृक्षारोपनाचा- गौरव संजयमामांचामा’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

आमदार संजयमामा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी आपआपल्या गावात वृक्षारोपनाचे सार्वजनिक कार्यक्रम राबवावेत व किमान ५५ चांगल्या झाडांचे वृक्षारोपन व संवर्धन करावे असे आवाहन प्रा. वीर यांनी केले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page