आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी मोरवड येथील दोघांना जामीन मंजूर
सदर प्रकरणी आरोपीतर्फे अॕड निखिल पाटील, अॕड दत्तप्रसाद मंजरतकर, अॕड सतपाल नरखेडे यांनी काम पाहिले.
करमाळा, दि. २४ (करमाळा-LIVE)-
आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी मोरवड येथील दोघांना जामीन मंजूर झाला आहे.यात हकीकत अशी की, करमाळा तालुक्यातील मोरवड येथील सुषमा अप्पासाहेब पानखडे हिने विषारी औषध प्राशन करून दि. 16/03/2024 रोजी राहत्या घरी आत्महत्या केलेली होती.
सदर प्रकरणी तिचे वडील राजेंद्र यशवंत ससाने (रा.रावगाव, ता. करमाळा) यांनी करमाळा पोलीस स्टेशन येथे आरोपी 1) आप्पासाहेब आजिनाथ पानखडे 2) संगीता आजिनाथ पानखडे व अजिनाथ भानुदास पानखडे यांच्याविरुद्ध सुषमा हिस वारंवार शिवीगाळ करून मानसिक त्रास देऊन जाचहाट केल्याने त्यांचे त्रासास कंटाळून तिने आत्महत्या केल्याबाबतची फिर्याद दाखल करण्यात आली होती.
सदर प्रकरणी यातील आरोपी संगीता व अजिनाथ तसेच आप्पासाहेब यांना 17/03/2024 रोजी अटक करण्यात आली होती.
तदनंतर त्यांनी अॕड निखिल पाटील यांचे मार्फत बार्शी येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय येथे जामीन मिळणे कामी धाव घेतली होती. सदर जामीन अर्जाची सुनावणी बार्शी येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री एल. एस. चव्हाण साहेब यांचे समोर झाली सदर जामीन अर्जाचे युक्तीवादावेळी आरोपी संगीता व अजिनाथ यांचे वकील अॕड निखिल पाटील यांनी त्यांचे युक्तिवादात आरोपींचा घटनेशी कसलाही संबंध नसून त्यांचा सुषमा हिने आत्महत्या करावा असा कोणताही उद्देश अथवा असे कोणतेही कृत्य केलेले नसल्याचा युक्तिवाद केला सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी संगीता आजिनाथ पानखडे व अजिनाथ भानुदास पानखडे यांची जामीनावर मुक्तता करण्यात आली.
सदर प्रकरणी आरोपीतर्फे अॕड निखिल पाटील, अॕड दत्तप्रसाद मंजरतकर, अॕड सतपाल नरखेडे यांनी काम पाहिले.