ठरलं तर मग! नागराजचा नवा चित्रपट ‘घर बंदूक बिरयाणी’ या तारखेला होणार रिलीज


जेऊर, दि. 12 (करमाळा-LIVE)-
जेऊर चे सुपुत्र आणि सैराट, फँड्री चे दिग्दर्शक, अभिनेते नागराज मंजुळे यांचा नवा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
येत्या 30 मार्च रोजी “घर बंदूक बिरयाणी रिलीज होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन हेमंत अवताडे यांनी केलेले असून नागराज मंजुळे हे क्रिएटिव्ह दिग्दर्शक आणि अभिनेत्याच्या भूमिकेत दिसणार असून सोबत अभिनेता सयाजी शिंदे, आकाश ठोसर असणार आहेत.

