करमाळ्यात आज नंदन प्रतिष्ठानच्यावतीने होम मिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रमाचे आयोजन

करमाळा, दि. ३ (करमाळा-LIVE)-
नंदन प्रतिष्ठानच्या वतीने गणेशोत्सव निमित्त संस्थेचे अध्यक्ष जितेश कटारिया यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रातील महिलांचा आवडता कार्यक्रम होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे या सोबत मिले सुर मेरा तुम्हारा या ऑर्केस्ट्रा चे देखील आयोजन करण्यात आले आहे.
आज बुधवार ३ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ६ वाजता हा कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमामधील पहिल्या तीन विजेत्या महिलांना आकर्षक बक्षिसे दिले जाणार आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी अंजना कृष्णा व्ही.एस (IPS) यांच्या हस्ते होणार असून या या कार्यक्रमासाठी तहसीलदार शिल्पा
ठोकडे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक गिरीजा मस्के या उपस्थित असणार आहेत.
हा कार्यक्रम संताजी नगर, नवीन भाजी मंडई जवळ,जुना बायपास रोड येथे होणार आहे.
तरी या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त महिलांनी उपस्थित राहावे असे आवाहन गणेशोत्सव समितीचे अध्यक्ष निलेश माने यांनी केले आहे.