करमाळ्यात नवरात्रीचे नऊ रंग स्पर्धा ; पृथ्वी सोशल फाउंडेशनचा उपक्रम

करमाळा, दि. २ (करमाळा-LIVE)-
करमाळा येथील पृथ्वी सोशल फाउंडेशनच्या वतीने श्री. कमलाभवानी शारदीय नवरात्रौत्सव निमित्त खास महिलांसाठी नवरात्राचे ९ रंग स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
सदर स्पर्धा कालावधी ३ ते ११ ऑक्टोबर दरम्यान असणार आहे. करमाळा शहर तसेच ग्रामीण अशा दोन गटात ही स्पर्धा असून १७ वर्षे पूर्ण व त्यापुढील युवती आणि महिला यात सहभाग घेऊ शकतात.
नवरात्रातील नऊ दिवसाच्या रंगानुसार साडी परिधान केलेला एक फोटो काढून 8605782996( संयोजिका Wattsup क्रमांक ) या नंबरवर पाठवायाचा आहे. घरबसल्या महिलांना भरघोस बक्षिसे जिंकण्याची सुवर्णसंधी फाऊंडेशन द्वारे उपलब्ध करून दिलेली आहे.
- LED TV – प्रथम क्रमांक
- केनस्टार कुलर- द्वितीय क्रमांक
- मिक्सर – तृतीय क्रमांक
- टेबल फॅन – चौथा क्रमांक
- हॉट प्लेट शेगडी – पाचवा क्रमांक
- सहा पैठणी साड्या – उत्तेजनार्थ बक्षिसे
तसेच ड्रॉ पध्दतीने सुध्दा बक्षिसे प्रयोजकांमार्फत देण्यात येणार आहेत.
शहरी व ग्रामीण दोन्ही गटात बक्षिसे असून जास्तीत जास्त महिलांनी सहभाग घ्यावा असे आवाहन संयोजन समिती मार्फत करण्यात येत आहे.