06/06/2025

राष्ट्रवादी काँग्रेसची ‘शिवस्वराज्य यात्रा’ मंगळवारी करमाळ्यात येणार ; जाहीर सभेचे आयोजन- माजी आमदार नारायण आबा पाटील यांची माहिती

0
IMG_20240810_194523.jpg

जेऊर, दि. १० (करमाळा-LIVE)-
करमाळ्यात शिवस्वराज्य यात्रेचे आगमन होतं असून कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे अहवान माजी आमदार आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे विधानसभा उमेदवार नारायण आबा पाटील यांनी केले आहे.

याबाबत अधिक माहिती देताना माजी आमदार पाटील यांनी सांगितले की, माजी केंद्रीय कृषी मंत्री शरदचंद्रजी पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शिवनेरी किल्यावरून शिवस्वराज्य यात्रेला सुरुवात केली आहे. ही यात्रा आपल्या करमाळा तालुक्यामध्ये मंगळवारी १३ ऑगस्टला रोजी आगमन होणार असून करमाळा येथील अथर्व मंगल कार्यालयात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे व राष्ट्रवादीचे प्रवक्ते खासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीमध्ये जाहीर सभा होणार आहे.

या यात्रेच्या माध्यमातून महायुती सरकारच्या काळातील करणाम्यांचा तसेच शेतकरी, महिला, युवकांच्या विरोधातील असलेल्या धोरणाबाबत पर्दाफाश करण्यात येत आहे. त्यामुळे शिवस्वाराज्य यात्रेच्या निमित्ताने करमाळा मतदार संघातील प्रलंबीत प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि शिवस्वराज्य यात्रेला पाठींबा देण्यासाठी कार्यकर्त्यांनी तसेच सुजाण नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहणे गरजेचे आहे.

यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रियाताई सुळे व खासदार अमोल कोल्हे यांची भाषणे होणार आहेत. शिवस्वराज्य यात्रेची जाहीर सभा ही दुपारी २ वाजता होणार असून कार्यकर्त्यांनी करमाळा येथील अथर्व मंगल कार्यालयात एकत्रित जमा व्हावे
असे आव्हान माजी आमदार नारायण आबा पाटील यांनी केले आहे.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष संतोष वारे, हनुमंत मांढरे-पाटील, बाजार समितीचे माजी संचालक देवानंद बागल तसेच राष्ट्रवादी पक्षाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page