20/10/2025

राजुरीच्या तृप्ती साखरे-सरोदे यांची महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश संघटक सचिवपदी निवड

0
aed6e75d380f4241a3dba7a9879f8f31.jpg

करमाळा, दि. 23 (करमाळा-LIVE)-
करमाळा तालुक्याच्या राजुरी गावची कन्या तृप्ती साखरे-सरोदे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित दादा गट) प्रदेश सचिव पदी निवड झाली आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, राष्ट्रवादीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल आणि राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा व महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या हस्ते पत्र देऊन निवडीचे पत्र देण्यात आले आहे.

राजकारणाची कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना सामाजिक कार्याच्या माध्यमातून समाजहिताची कामे करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून काम करत असताना सुरुवातीलाच सोलापूर जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली होती. निवडीनंतर दोन वर्षे सोलापूर जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसची जबाबदारी समर्थपणे सांभाळल्या नंतर तृप्ती साखरे-सरोदे यांनी आपल्या सासरी पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यामध्ये हिरकणी प्रतिष्ठानच्या माध्यमातून तसेच परत पुणे जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्ष पदाच्या माध्यमातून तालुक्यातील महिलांच्या आरोग्याचे, सुरक्षेचे, बचत गटाचे विविध प्रश्न, विजेचे प्रश्न, एमआयडीसीचे प्रश्न सोडवायला सुरवात केली व यामाध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सोबत महिलांचे संघटन जोडले जाऊ लागले. याचीच दखल घेऊन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर, महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्या माध्यमातून तृप्ती साखरे-सरोदे यांची महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश सचिव पदी निवड करण्यात आली.

सामान्य घरातील कार्यकर्ता ते प्रदेश पातळीवर सचिव म्हणून निवड झाल्याबद्दल करमाळा तालुक्यातील सामान्य लोकांनी, सोलापूर जिल्हा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी तसेच कार्यकर्त्यांनी व राजुरीकरांनी निवडीचे स्वागत केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हेही वाचा….

You cannot copy content of this page