08/06/2025

जेऊर ते पुणे एसटी बस सेवा सुरू करा ; प्रवासी संघटनेची मागणी

0
IMG-20240405-WA0025.jpg

जेऊर, दि. ५ (करमाळा-LIVE)-
करमाळा तालुक्यातील जेऊर, चिखलठाण, वाशिंबे व पारेवाडी परिसरातील लोकांच्या सोयीसाठी जेऊर ते एस, टी, बससेवा सुरू करण्याची मागणी जेऊर प्रवासी संघटनेच्या वतीने करमाळा आगारप्रमुखांकडे करण्यात आली आहे.

या परिसरातील अनेक मुले पुणे-बारामती या ठिकाणी शिक्षणासाठी तसेच नोकरीसाठी आहेत. त्यामुळे दररोज या परिसरातून पुण्याला जाणाऱ्या लोकांची संख्या मोठी आहे करमाळा किंवा टेंभुर्णी वरून पुण्याला जाण्यासाठी बस उपलब्ध असल्या तरी या परिसरातील लोकांचा ज्यास्त वेळ व पैसा खर्च होत असल्याने यामधील मार्गावरून बस सुरू झाल्यास याचा फायदा लोकांना होणार आहे. विचार करून प्रवासी संघटनेच्या वतीने जेऊर- पोफळज – उमरड – मांजरगाव – वाशिंबे चौफुला – पारेवाडी सबस्टेशन – हिंगणी – भगतवाडी – जिंती बायपास – रामवाडी – बाबळगाव – खेड – भिगवन – पुणे (स्वारगेट) या मार्गे बस सेवा चालू करण्यासंबंधी करमाळा आगार प्रमुखांना निवेदन देण्यात आले आहे.

जेऊर व जेऊर परिसरातील प्रवाशांच्या नागरिकांच्या तसेच विद्यार्थी यांच्या मागणीनुसार जेऊर येथून सकाळी साडेसात वाजता पुण्याच्या दिशेने बस सेवा सुरू करण्याची मागणी अनेक दिवसापासून होत आहे जेऊर ते पुणे बस सेवा सुरू झाल्यास जेऊर परिसरात संपर्क असणाऱ्या वीस ते पंचवीस गावांना याचा फायदा होणार आहे विद्यार्थी नोकरदार वर्ग महिला तसेच वृद्धांना ही बस सेवा सुवेधेची ठरणार आहे व महामंडळाचे उत्पन्नही वाढण्यास मदत होणार आहे त्यामुळे आपण ही बस सेवा सुरू करावी व ग्रामीण भागातील लोकांना शहराला जोडण्यासाठी सोयीस्कर ठरणारी बस सेवा चालू करण्यात यावी आशी विनंती प्रवासी संघटनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.

निवेदन देतेवेळी प्रवासी संघटनेचे अधक्ष सुहास सुर्यवंशी, उपाध्यक्ष प्रवीण करे, राजकुमार राठोड, अल्लाउद्दीन मुलानी, सलीम पठाण, बाळासाहेब गरड उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page