सोलापूर- दौंड नवीन डेमो रेल्वे गाडीचे जेऊर येथे स्वागत- जेऊर प्रवासी संघटनेतर्फे कर्मचाऱ्यांचा सन्मान
जेऊर, दि. 17 (करमाळा-LIVE)-
सोलापूर रेल्वे विभागातून सोलापूर-दौंड-सोलापूर ही नवीन डेमो रेल्वे गाडी आजपासून सुरू झाली असून आज दुपारी दोन वाजता जेऊर रेल्वे स्टेशवर या डेमो गाडीचे उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी डेमो गाडीतील कर्मचाऱ्यांचा सत्कार जेऊर प्रवासी संघटना व जेऊर ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला.
सदरील डेमो गाडी आज शुक्रवार 17 मार्च पासून सुरू झालेली असून याचा फायदा प्रवाशांना होणार आहे.
वेळापत्रक पुढीलप्रमाणे-
गाडी क्रमांक 01461 सोलापूर ते दौंड डेमो-
1) सोलापूर- 10.00 (सकाळी)
2) मोहोळ- 10.27 (सकाळी)
3) माढा- 10.57 (सकाळी)
4) कुर्डूवाडी- 11.18 (सकाळी)
5) केम- 11.35 (सकाळी)
6) जेऊर- 11.50 (सकाळी)
7) पारेवाडी- 12.15 (दुपारी)
8) भिगवन- 12.35 (दुपारी)
9) दौंड- 3.35 (दुपारी)
गाडी क्रमांक 01462 दौंड ते सोलापूर डेमो-
1) दौंड- 6.25 (संध्याकाळी)
2) भिगवन- 6.45 (संध्याकाळी)
3) पारेवाडी- 7.05 (संध्याकाळी)
4) जेऊर- 7.27 (संध्याकाळी)
5) केम- 7.40 (संध्याकाळी)
6) कुर्डूवाडी- 7.58 (रात्री)
7) माढा- 8.15 (रात्री)
8) मोहोळ- 8.45 (रात्री)
9) सोलापूर- 11.35 (रात्री)