बी.बी.ए आणि बी.सी.ए कोर्सेस साठी महाविद्यालय स्तरावर सीईटी (CET) घेण्यासाठी परवानगी द्यावी-
करमाळा, दि. २६ (करमाळा-LIVE)-
बी.बी.ए आणि बी.सी.ए पदवी ला सीईटी घेण्यासाठी महाविद्यालयांना परवानगी देण्यात यावी अशी मागणी उच्च शिक्षण संस्था चालकांची सेवाभावी संस्थेच्या वतीने केली आहे.
२०२३ पर्यंत बी.बी.ए आणि बी.सीए या पदवी साठी विद्यार्थ्यांना महाविद्यालय स्तरावर प्रवेश मिळत होता परंतु २०२४ या शैक्षणिक वर्षापासून हे कोर्स AICT कडे सलग्न करण्याबाबत आदेश आलेले आहेत. आणि ज्या महाविद्यालयांनी AICT कडे नोंदणी केली आहे अशाच महाविद्यालयात सीईटी घेण्यात आलेली आहे.
त्यामुळे मोजक्याच विद्यार्थ्यांनी सीईटी दिलेली आहे. त्यामुळे सदरील कोर्सेस करण्यासाठी मोजकेच प्रवेश होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सदरील कोर्सेस ला महाविद्यालय स्तरावर सीईटी घेण्याची परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.