जलतरणपटू सुयश जाधव याचा पांगरे ग्रामस्थांच्या वतीने सन्मान
करमाळा, दि. 15 (करमाळा-LIVE)-
करमाळा तालुक्यातील पांगरे चे सुपुत्र सुयश नारायण जाधव यांनी हांँगझाऊ, चीन येथे झालेल्या पॕरा एशियाई गेम्स मध्ये 50 मीटर बटरफ्लाय स्विमिंग मध्ये भारतासाठी ब्रांझ पदक मिळवल्याबद्दल पांगरे ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
सुयश जाधव याच्या वयाच्या बाराव्या वर्षी अपघाताने विजेच्या तारेला चिकटुन दोन्ही हात गमवावे लागले. अशा अपंगत्वावर मात करून जिद्दीने त्याने अपंगत्वाचा कोणताही बाऊ न करता स्वतःच्या मेहनतीने, कष्टाने देशाचे प्रतिनिधित्व जागतिक स्तरावर करण्याचा मान मिळवून देशासाठी पदक मिळवले आहेत.
लहानपणापासून खेळात आवड असले कारणाने स्विमिंग मध्ये सुरुवातीला शालेय स्पर्धा, जिल्हा, राज्यस्तरीय, देशपातळीवर आणि त्यानंतर जागतीक पातळीवर होणाऱ्या स्पर्धेमध्ये देशाचे प्रतिनिधित्व पॅरा ऑलिंपिक खेळामध्ये केलेले आहे. त्यामध्ये त्याने चांगली कामगिरी केलेले आहे. त्याला शासनाचे छत्रपती पुरस्कार, अर्जुन पुरस्कार आदी पुरस्कार मिळालेले आहेत. हल्ली हांगझाऊ, चीन येथे झालेल्या प्यारा एशियाई गेम्स मध्ये पन्नास मीटर बटरफ्लाय मध्ये ब्रांझ पदकाची कमाई केली आहे. त्या स्पर्धेत भारतासाठी स्विमिंग मध्ये केवळ एकमेव पदक आहे. मिळालेल्या सर्व यशाचे श्रेय तो आपल्या आई-वडिलांना देतो. त्याचे वडील हे खेळाचे शिक्षक होते.
सुयश चे वडील नारायण जाधव सर त्यांचाही यावेळेस सत्कार करण्यात आला. सत्कारासाठी पांगरे गावचे सरपंच प्रतिनिधी ॲड. दत्तात्रय सोनवणे, मकाई कारखान्याचे संचालक सचिन पिसाळ, अरुण शेंडगे, बाळासाहेब गुटाळ, अशोक गाडे, सागर टेकाळे, भैरवनाथ हाराळे, जोतिराम गाडे, विठ्ठल कदम, ओंकार कुलकर्णी, सचिन गायकवाड सर, विष्णु जाधव, तुकाराम पिसाळ, महादेव जाधव आदी बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
- रोजगार हमी योजनेतून सिंचन विहिरीच्या जाचक अटी शिथिल करा- भाजप जिल्हा सचिव लक्ष्मण केकान
- करमाळ्यात मराठा कुणबी प्रकरणासाठी अडवणूक ; ऐजंट आणि अधिकाऱ्यांमध्ये मिलीभगत- युवासेनेचा धरणे आंदोलनाचा इशारा
- भाळवणीच्या तृप्ती वाघमारे चे नीट (NEET) परीक्षेत घवघवीत यश
- कुंभेजच्या बागल विद्यालयात केंद्रस्तरीय क्रिडा स्पर्धांचे आयोजन
- २०१४ ला २५७ चा मटका नव्हता, जनतेचा कौल होता! हे २०२४ लाही जनतेने दाखवून दिले ; विरोधकांना पाटील गटाचा “हाबाडा”