पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल ‘पवनपुत्र’ चे संपादक दिनेश मडके यांचा सन्मान

करमाळा, दि. 1 (करमाळा-LIVE)-
डिजिटल मीडिया संपादक संघटना महाराष्ट्र व मानवता संयुक्त संघ यांच्या विद्यमाने पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल दिनेश मडके यांचा आदर्श पत्रकार म्हणून गौरव करण्यात आला.
या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमास अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मतराव जाधव पोलीस उपयुक्त विजय कबाडे डिजिटल मीडिया संपादक संघटनेचे अध्यक्ष राजा माने, जिल्हा परिषद मुख्य लेखाधिकारी अजयसिंह पवार डॉक्टर विजय कुमार केसकर, संघटन मंत्री मानवता संयुक्त संघ सोलापूर जिल्हा अध्यक्ष विजय थोरात, डिजिटल मीडियाचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा उपाध्यक्ष विजयकुमार कोरे, मानवता संयुक्त संघाचे जिल्हा उपाध्यक्ष विश्वजीत देशमुख, डिजिटल मीडियाचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष विजयकुमार कोरे, सोलापूर शहराध्यक्ष प्रशांत कटारे यांच्या मान्यवरांच्या उपस्थितीत शाल प्रमाणपत्र सन्मानचिन्ह देऊन डिजिटल मीडिया संपादक संघ पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष दिनेश मडके यांचा सत्कार करून गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमास डिजिटल मीडिया संपादक संघटनेचे सर्व पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

