20/10/2025

वीट सह तालुक्याच्या उत्तर भागातील गावे सिंचनाखाली आणण्यासाठी प्रयत्नशील- आमदार नारायण आबा पाटील

0
IMG-20250730-WA0046.jpg

करमाळा, दि. ३० (करमाळा-LIVE)-
वीट आणि तालुक्याच्या उत्तर भागातील गावे सिंचनाखाली आणण्यासाठी आपण प्रयत्नशील असून नियोजित रिटेवाडी उपसा सिंचन योजना कार्यान्वित करणे हेच प्रमुख ध्येय असल्याचे ठाम प्रतिपादन विद्यमान आमदार नारायण आबा पाटील‌ यांनी केले.

वीट येथील कार्यक्रमात ते बोलत होते. कुकडीचे पावसाळी आवर्तन सध्या चालू असून वीट गावातील तलाव व‌ बंधारे भरले गेल्याने या परिसरातील शेतकऱ्यांच्या वतीने पाणी पुजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. गेल्या वीस दिवसांपासून आमदार नारायण आबा पाटील‌ यांनी दाखवलेल्या कार्यतत्परता व नियोजनामुळे कुकडीचे मुबलक पाणी सध्या तालूक्यात घेतले जात आहे.

यामुळे वीट येथे पाणी पुजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी बोलताना आमदार नारायण आबा पाटील‌ म्हणाले की, वास्तविक पाहता करमाळा तालुक्यातील उत्तर भाग हा सिंचना पासून‌ गेली कित्येक वर्षे वंचित आहे. या भागात मांगी तलावा सारखे मोठे पाणीसाठे उपलब्ध आहेत तसेच गावोगाव तलाव व बंधारे आहेत. परंतु साठवण करण्यासाठी पाणी नाही. कुकडीचे पाणी हे तालूका टेल मायनरला असल्याने पोहचताना अनेक अडचणी येतात. यामुळेच वैयक्तिक माझ्या संकल्पनेतून नियोजित रिटेवाडी उपसा सिंचन योजना आपण शासन दरबारी मांडली. सध्या सर्वेक्षण करण्यास मंजुरी मिळाली असुन ही योजना कायमस्वरूपी कार्यान्वित होण्यासाठी आपण प्रयतन करत आहोत. वीट आणि परिसरातील सिंचन, वीज, दळणवळण, ग्रामविकास व आरोग्य या प्रश्नावर आपण बारकाईने लक्ष देऊन आहोत. जास्तीत जासत प्रश्न सुटुन या भागाचा सर्वांगीण विकास केला जावा यासाठीच आपण प्रयत्न करत असल्याचे आमदार नारायण आबा पाटील‌ यांनी आवर्जून सांगितले.

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य बिभीषण आवटे, सुभाष जाधव, सुनील ढेरे, श्रीरंग जाधव, आदिनाथ संचालक देवानंद बागल,राजेद्रसिंह राजेभोसले, तात्यासाहेब जाधव, डिगांबर गाडे, बाळासाहेब गाडे, संतोष ढेरे, केशव चोपडे, डॉ ढेरे, अशोक राऊत, बिभिषन ढेरे, नवनाथ जाधव, हनुमंत ढेरे, बाबासाहेब ढेरे, रघुनाथ ढेरे, सतिष निंबाळकर, धोडींबा जाधव, प्रकाश ढेरे, धनसिंग भोंग, कृष्णा ढेरे, गणेश ढेरे, गणेश जाधव, जगदिश निबाळकर, अंकुश जाधव, भाऊ गाडे, आण्णा जाधव, सुनिल टेलर, धनसिंग जाधव, भाऊ ढेरे, नवनाथ कोळी, आदिनाथ पवार,आदिसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हेही वाचा….

You cannot copy content of this page