06/06/2025

आमदार संजयमामा शिंदे यांची निष्क्रियता झाकण्यासाठी आमदार बबनदादा शिंदे यांना वांगी येथे प्रचारासाठी यावे लागले- प्रवक्ते सुनील तळेकर

0
IMG-20241109-WA0012.jpg

करमाळा, दि. १० (करमाळा-LIVE)-आमदार संजयमामा शिंदे यांची निष्क्रियता झाकण्यासाठी आमदार बबनदादा शिंदे यांना वांगी येथे प्रचारासाठी यावे लागले असा घणाघाती टोला प्रवक्ते सुनील तळेकर यांनी लगावला.

काल अपक्ष उमेदवार संजयमामा शिंदे यांच्या प्रचारासाठी चक्क माढा तालुक्याचे आमदार बबनदादा शिंदे यांना करमाळा तालुक्यातील वांगी-३ येथे यावे लागले. यावर विरोधकांना टीका करण्याची आयतीच संधी चालून आली. यावर माजी आमदार नारायण पाटील यांचे उमेदवार प्रतिनिधी सुनील तळेकर यांनी हल्लाबोल केला.

यावर बोलताना ते म्हणाले की, करमाळा मतदार संघांचे आमदारपद मिळाल्यावर संजयमामा यांनी येथील जनतेला वाऱ्यावर सोडले. करमाळा मतदार संघाच्या आजवरच्या इतिहासातील सर्वात निष्क्रिय आमदार म्हणून संजयमामा शिंदे यांच्या या पाच वर्षाची नोंद झाली. आता निवडणूक जवळ आल्यावर या तालुक्यातील मागील निवडणुकीतील सहकारी माजी आमदार जयवंतराव जगताप गट व कामगार नेते स्व. सुभाष (अण्णा) सावंत गट शिंदे यांना पराभूत करण्यासाठी साथ सोडली.

पाच वर्षाची निष्क्रियता लोक बोलून दाखवायला लागले. माढा तालुक्यातील छत्तीस गावा मध्येही मतदार संजयमामा यांना सभेत अडवून पाच वर्षें कोठे होते व काय काम केले ते दाखवा असे उघड बोलू लागले. यामुळे आता निमगावच्या चिंतन बैठकीत संजयमामा ढसा ढसा रडले व बबनदादा यांनी करमाळा तालुक्यात प्रचाराला यावेच असा आग्रह धरला.

म्हैसगावं येथील कारखाना मागताना जशी आदळ आपट केली अगदी तशीच आदळ आपट संजयमामा यांनी केली व शेवटी माढा मतदार संघातील मामा गटाची मते विरोधात जायला नको या काळजी पोटी बबनदादा यांना करमाळा येथील वांगी मध्ये सभेसाठी यावे लागले. एकीकडे आपले वय झाल्याने निवडणुकीतून माघार घेऊन मुलाला उभे केलेल्या बबनदादा यांना संजयमामा यांच्या प्रचारासाठी यावे लागणे म्हणजेच दोन्ही शिंदे बंधू पराभवाच्या उंबरठ्यावर आहेत असे स्पष्ट संकेत दिसून येत आहेत. परंतु करमाळा तालुक्यातील जनता सुज्ञ असल्याने सर्व काही समजून आहेत. आता आणखी काही दिवसात संजय मामा शिंदे यांच्या स्टेज वरील अनेक कार्यकर्ते आमच्या संपर्कात असल्याचा व त्यांचे अधिकृत प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात होणार असल्याचा गौप्य स्फ़ोट सुनील तळेकर यांनी केला.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page