पोफळज :अजब संसाराची गजब कहाणी; दहा दिवसांचा संंसार, बारा वर्षे वेेगळे राहिल्यानंतर कौटुंबिक हिंसाचार तक्रार; न्यायालयाकडून तक्रार रद्द
सदर खटल्यात ॲड.निखिल पाटील व ॲड.दत्तप्रसाद मंजरतकर यांनी काम पाहिले.
जेऊर, दि. 10 (करमाळा-LIVE)-
दहा दिवसांचा संंसार, बारा वर्षे वेेगळे राहिल्यानंतर कौटुंबिक हिंसाचार झाल्याची तक्रार आली असता ती तक्रार आता रद्दबातल झाली आहे.
याबाबत हकीकत अशी की, 4 जुलै 2010 रोजी करमाळा तालुक्यातील पोपळज येथील एका तरुणाचा विवाह झाला होता. त्यानंतर तो युवक व युवती दहा दिवस एकत्र राहिले होते व त्यानंतर 2021 सालापर्यंत दोघांमध्ये कसलाच संपर्क नव्हता व तदनंतर सन 2021 मध्ये यातील तरुणीने कौटुंबिक हिंसाचार पासून महिलांचे संरक्षण कायदा 2005 अंतर्गत माढा येथील मा.न्यायालयात सदरील तरुण व ईतर नातेवाईक विरुद्ध तिचा कौटुंबिक छळ व हिंसाचार झाला असेल बाबत माढा येथील मा.न्यायालयात अर्ज केला होता तद्नंतर या अर्जाची दखल घेऊन सदर तरुण व ईतरां विरुद्ध नोटीस देऊन सदर अर्जावर त्यांच्याकडून म्हणणे मा.न्यायालयात सादर करण्यास सांगण्यात आले होते त्या तरुण व ईतर यांनी ॲड.दत्तप्रसाद मंजरतकर यांच्यामार्फत सदरील अर्जावर लेखी म्हणणे सादर करण्यात आले.
तदनंतर युक्तिवादात लग्नानंतर सदर युवती जेमतेम दहा दिवस एकत्र राहिलेत त्या दहा दिवसांचेच संसारात हिंसाचार होऊ शकतो यावर आक्षेप घेत सदर तरुणी स्वतःहून कोणास काहीएक न सागंता घर सोडून निघून गेली होती तसेच हिंसाचार झाला असता तर तिने 2010 मध्ये तक्रार दिली असती परंतु सदर तरुणीने 2021 पावेतो कोणतीही तक्रार सक्षम आधिकारी यांचेकडे केली नाही अथवा मा.न्यायालयात याबाबत दाद मागितली नाही यावरून तिचा कौटुंबिक छळ झाला आहे असे म्हणता येणार नाही असा युक्तिवाद अॕड दत्तप्रसाद मंजरतकर यांनी केला. तसेच याबाबत मा.सर्वोच्च न्यायालय व मा.उच्च न्यायालय येथील विविध न्याय निवाडे दिले. सदरील युक्तिवाद ग्राह्य धरून मा.न्यायाधीश वाय.एय.अखारे साहेब यांनी सदर तरुणीचा अर्ज रद्दबादल केला.