पोफळज ग्रामपंचायत निवडणुकीत ट्विस्ट: सरपंचपदाचे उमेदवार संतोष पवार यांचा कल्याण पवार यांना पाठिंबा; निवडणूक झाली एकतर्फी
जेऊर, दि. 12 (करमाळा-LIVE)-
करमाळा तालुक्यातील पोफळज येथील ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचपदासाठी दुरंगी लढत होत असताना श्री ग्रामदैवत वेताळसाहेब युवा ग्रामविकास परिवर्तन पॕनल चे उमेदवार प्रगतशील बागायदार संतोष पवार यांनी माघार घेतली असून श्री वेताळसाहेब ग्रामविकास आघाडीचे उमेदवार माजी जिल्हा उप निबंधक कल्याण पवार यांना पाठिंबा जाहीर केल्यामुळे आता निवडणूक एकतर्फी झालेली आहे.
नऊ सदस्य असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत अगोदरच सात सदस्य बिनविरोध निवडून आलेले असून दोन जागांसाठी आता चार उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उभे आहेत. प्रभाग क्रमांक एक, दोन बिनविरोध झालेल्या असून प्रभाग क्रमांक तीन (हजारवाडी) मध्ये एक जागा बिनविरोध झालेली आहे दोन जागांसाठी आप्पासाहेब हजारे विरूद्ध प्रविण हजारे तर कुसुम हजारे विरूद्ध शितल हजारे असा सामना होत आहे.
बिनविरोध निवडून आलेले ग्रामपंचायत सदस्य-
प्रभाग क्रमांक 1-
1) रेखा कांबळे
2) ज्योतिराम गोळे
3) राणी गव्हाणे
प्रभाग क्रमांक-2
1) बिभीषण पवार
2) सुमन सुरवसे
3) जया पवार
प्रभाग क्रमांक-3
1) रविंद्र कांबळे